Rahul Gandhi: पंतप्रधानांचा माफीनामा ते प्रधानांचा राजीनामा...राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेतील १० ठळक मुद्दे

Rahul Gandhi Press conferance: राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर घणाघात केला. ते पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले हे घ्या जाणून...
Rahul Gandhi: पंतप्रधानांचा माफीनामा ते प्रधानांचा राजीनामा...राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेतील १० ठळक मुद्दे
Rahul GandhiSaam Tv
Published On
  • पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांची माफी मागावी

  • राहुल गांधी यांनी केली मागणी

  • शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांनी देखील राजीनामा द्यावा अशी मागणी

  • पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवर मोदी सरकारवर जोरदार टीका

दिल्लीमध्ये सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या आंदोलनाला विरोधी पक्षांकडून पाठिंबा मिळत आहे. या आंदोलनाला पाठिंबा देत राहुल गांधी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

या सर्व घडामोडींनंतर राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी संसदेवरील मोर्चा, नीट पेपरफुटी प्रकरण आणि विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीमारावर आपले मत व्यक्त करत मोदी सरकारला खडेबोल सुनावले. राहुल गांधी यांनी या पत्रकार परिषदेमध्ये नेमक्या काय मागण्या केल्या आणि मोदी सरकारवर काय आरोप केले हे आपण १० मुद्द्यांमध्ये जाणून घेणार आहोत...

- विद्यार्थ्यांना अमानुषपणे वागणूक देण्यात आली. माझ्यासोबत जे घडलं त्याची मला पर्वा नाही. आणखी पाच वेळा जरी माझ्यासोबत असाच व्यवहार झाला तरी मला त्याचं काहीच वाटणार नाही. पण विद्यार्थ्यांचा मुद्दा महत्वाचा आहे. त्यामुळे आमचा लढा चालूच राहील.

- राहुल गांधी यांनी या पत्रकार परिषदेवेळी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यांनी यावेळी धर्मेंद्र प्रधान यांच्यावर अपयश आणि भ्रष्टाचाराचा आरोप केला. ते या पदावर पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. परीक्षेचे पेपेर एकापाठोपाठ फुटत आहेत आणि ते शिक्षण व्यवस्था चालवण्यास असमर्थ आहेत.

- राहुल गांधी यांनी पीएम मोदींच्या राजीनाम्याची मागणी करत असे सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची आणि विद्यार्थ्यांची माफी मागितली पाहिजे. विद्यार्थ्यांवर अन्याय आणि अत्याचार झाला हे मोदींनी मान्य करत मोठ्या मनाने माफी मागावी.

Rahul Gandhi: पंतप्रधानांचा माफीनामा ते प्रधानांचा राजीनामा...राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेतील १० ठळक मुद्दे
Rahul Gandhi: पंतप्रधान मोदींच्या घराबाहेर ठिय्या, राहुल गांधींच्या ५ मागण्या कोणत्या?

- ज्यांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण केली आहे. त्यांना या प्रकरणात जबाबदार धरले पाहिजे, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली. मुलांनी आत्महत्या केल्या आहेत. आपले विद्यार्थी प्रचंड तणावातून जात आहेत आणि ऐनवेळी त्यांना सांगितले जाते की पेपर फुटला आहे.

- विद्यार्थ्यांनी काय चुकीचे केले आहे. सुरक्षा दल त्यांच्यावर हल्ला करत आहेत. ते शांततेने आपल्या मागण्या मांडत आहेत. ते विचारत आहेत की या देशाचे त्यांच्यावर काय देणे आहे. त्यांची फक्त एवढीच मागणी आहे की, देशातील विद्यार्थ्यांना एक निष्पक्ष आणि न्याय शिक्षण व्यवस्था मिळावी.

- राहुल गांधी यांनी असेही सांगितले की, शिक्षण पूर्ण झाल्यावर तुम्ही डॉक्टर, वकील बनता किंवा एखादे कौशल्य शिकता. पण मग अचानक तुम्हाला सांगितले जाते की तुमच्यासाठी जी दारे उघडायला हवी होती ती बंद झाली आहेत. उत्पादन क्षेत्र पूर्णपणे बंद झाले आहे.

Rahul Gandhi: पंतप्रधानांचा माफीनामा ते प्रधानांचा राजीनामा...राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेतील १० ठळक मुद्दे
हातात बेड्या अन् प्रचंड राग...पंतप्रधानांच्या घराबाहेर राहुल गांधींनी केलेल्या आंदोलनाची दृश्ये, पाहा PHOTO

- तुमच्या आजूबाजूला पाहा तुम्हाला सर्वत्र फक्त चिनी उत्पादनेच दिसतील. उद्योजकता बंद झाली आहे. फक्त दोन-तीन मोठ्या कंपन्यांनाच बँकांकडून निधी मिळते. ज्या तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांना कोणतीही संधी मिळत नाही.

- कार्पोरेट क्षेत्रातील नोकऱ्याही नाहीशा होत आहेत. एआय आणि आयटी क्षेत्रात कर्मचारी कपात सुरू आहे. सार्वजनिक क्षेत्राचे खासगीकरण सुरू आहे. तरुणांसाठी सरकारी नोकरी हाच एकमेव पर्याय उरला आहे. त्यांनी सरकारवर आरोप केला की, तुम्ही तरुणांना एकच दार देता, बाकीचे दारं बंद करता. मग त्या एका व्यवस्थेमध्ये फेरफार करून ती आवाक्याबाहेरची बनवता. मग तुम्ही अपेक्षा करता की त्यांनी नोकरी सोडू नये.'

राहुल गांधी यांनी आरोप केला की, गेल्या १० वर्षांत १५२ परीक्षांचे पेपर फुटले आहेत. म्हणजे सरासरी दर महिन्याला १ पेपर फुटला आहे. लाखो विद्यार्थ्यांना आधीच सह करावा लागलेला तोच तणाव पुन्हा सहन करण्यास सांगितले जात आहे. सरकारला याची काहीच चिंता नाही.

सरकारने केलेल्या घोटाळ्याच्या परिणाम देशातील ७५ दशलक्ष विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबावर झाला आहे. यामध्ये साधारणत: मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबे आहेत. ही कुटुंबे आपल्या कष्टाचे पैसे शिक्षणात गुंतवतात पण त्यांची फसवणूक केली जाते. काही व्यक्ती त्यांची फसवणू करत आहेत त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com