Rahul Gandhi: पंतप्रधान मोदींच्या घराबाहेर ठिय्या, राहुल गांधींच्या ५ मागण्या कोणत्या?

Rahul Gandhi Protest: राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करत आहेत. विरोधक आणि कार्यकर्त्यांसह त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केला आहे. त्यांनी सरकारपुढे ५ मागण्या ठेवल्या आहेत.

सीजेपीच्या आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. या लाठीमारमध्ये अनेक आंदोलक गंभीर जखमी झाले. या घटनेच्या निषेधार्थ आज काँग्रेसह विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केले. राहुल गांधी यांच्यासोबत प्रियंका गाधी आणि काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते. या आंदोलनादरम्यान राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी आणि त्यांच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग आले होते. त्यांच्यासमोर राहुल गांधी यांनी ५ मागण्या ठेवल्या. या मागण्या ऐकल्यानंतर जितेंद्र सिंग हे अमित शहा यांच्या भेटीसाठी गेले आहेत.

राहुल गांधींच्या ५ मागण्या कोणत्या?

- शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या.

- आंदोलकांवरील लाठीचार्जची चौकशी करा.

- अधिवेशनामध्ये नीट पेपरफुटीवर चर्चा करा

- गृहमंत्र्यांनी याविषयी दोन्ही सदनात निवेदन द्यावे.

- आंदोलनात झालेल्या हिंसाचारावर निष्पक्ष चौकशी करावी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com