रितेश-जिनिलियाचा विद्यार्थ्यांना पाठिंबा
CJP आंदोलनाला पाठिंबा देत ट्विट शेअर
सोनम वांगचुक यांना सामान्य जनतेपासून ते कलाकारांपर्यंत अनेकांचा पाठिंबा
जगभरातून NEET परीक्षा घोटाळ्याच्या विरोधात विद्यार्थी आणि पालकांकडून तीव्र संताप व्यक्त होताना दिसत आहे. दिल्लीत जंतर मंतर येथे 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) चे जोरदार आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला सामान्य जनतेपासून ते मनोरंजन विश्वातील कलाकारांपर्यंत अनेकांचा पाठिंबा मिळताना दिसत आहे. यात शबाना आझमी, सयाजी शिंदे, अतुल कुलकर्णी, झीनत अमान, प्रकाश राज, हेमंत ढोमे, स्वरा भास्कर अशा अनेक मराठी आणि बॉलिवूडच्या कलाकारांचा समावेश आहे.
आता विद्यार्थ्यांना महाराष्ट्राचे लाडकी जोडी रितेश देशमुख आणि जिनिलियाने देखील पाठिंबा दिला आहे. रितेश देशमुख आणि जिनिलियाने ट्विट पोस्ट करून आपला पाठिंबा दाखवला आहे. त्यांची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पोस्टमध्ये नेमकं काय म्हटले, जाणून घेऊयात.
"आम्ही आमच्या देशातील तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.
त्यांचा आवाज ऐकला गेला पाहिजे. तो आवाज बुलंद, स्पष्ट आणि निर्भय असावा.
तेच आपल्या लोकशाहीचा प्राण आणि आपल्या राष्ट्राच्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत.
चला, आपण त्यांचे म्हणणे ऐकून घेऊया, त्यांना पाठिंबा देऊया आणि त्यांना सक्षम करूया.
आपल्या तरुणांची ऊर्जा, धैर्य आणि स्वप्नेच त्या भारताला आकार देतील, ज्याची निर्मिती करण्याचे स्वप्न आपण पाहतो.
जय हिंद.
जिनिलिया आणि रितेश देशमुख"
सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केल्यावर अभिजीत दिपके उपोषणाला बसले होते. मात्र नंतर सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून अभिजीत दिपके याने उपोषण मागे घेतले. २० जुलैला जंतर मंतरवर विद्यार्थ्यांनी, पालक आणि नागरिकांची तुफान गर्दी पाहायला मिळाली. तेव्हा पोलिसांकडून आंदोलनकरत्यांवर लाठी चार्ज करण्यात आला. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप वाढला.
NEET वैद्यकीय प्रवेश परीक्षेत झालेली अनियमितता, पेपरफुटी आणि परीक्षा रद्द करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत सोनम वांगचुक हे उपोषणाला बसले होते. सोनम वांगचुक यांनी २८ जून २०२६ रोजी नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे हे उपोषण सुरू केले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.