१ नाही, २ नाही तब्बल ६ भाषांमध्ये एकाच वेळी 'बिग बॉस' सुरू होणार, सलमान खान गाजवणार हिंदी Bigg Boss

Six Bigg Boss Editions : बिग बॉसच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. एकाच वेळी सहा भाषांमध्ये 'बिग बॉस' पाहायला मिळणार आहे. सविस्तर माहिती जाणून घ्या.
Six Bigg Boss Editions
Bigg BossSAAM TV
Published On
Summary

बिग बॉसच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी

एकाच वेळी सुरू होणार ६ भाषांमध्ये बिग बॉस

सलमान खान पुन्हा घेणार स्पर्धकांची शाळा

बिग बॉसच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. 'जिओस्टार' एकाच वेळी सहा वेगवेगळ्या भाषांमध्ये 'बिग बॉस' घेऊन येणार आहे. भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासात असे पहिल्यांदाच होत असावे. पहिल्यांदाच सहा वेगवेगळ्या भाषांमधील 'बिग बॉस'चे नवे सीझन एकाच वेळी देशभरात प्रदर्शित होणार आहेत.

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, सप्टेंबर 2026 पासून 'बिग बॉस' च्या सहा आवृत्त्या सुरू होणार आहेत. 'बिग बॉस' फ्रँचायझीने एक नवीन उंची गाठली आहे. हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम आणि बंगाली भाषांमध्ये 'बिग बॉस' पाहायला मिळणार आहे. हे टीव्ही नेटवर्कवर तसेच OTT प्लॅटफॉर्म JioHotstar वर स्ट्रीम केले जाईल. 'जिओस्टार'ने 'इंडियाज बिग रिअ‍ॅलिटी' (India's Bigg Reality) हे कॉफी-टेबल बुक देखील प्रकाशित केले आहे, ज्यामध्ये 'बिग बॉस'चा गेल्या काही वर्षांतील प्रवास मांडला आहे.

'बिग बॉस २०'चे होस्टिंग करणार सलमान खान

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान 'बिग बॉस २०'चे होस्टिंग करणार आहे. सलमान खानला पुन्हा 'वीकेंड का वार' मध्ये पाहायला प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत. 'बिग बॉस १९' चे विजेतेपद टिव्हीचा प्रसिद्ध अभिनेता गौरव खन्ना यांनी जिंकले होते. तर फरहाना भट्ट उपविजेता ठरली होती. आता दोघेही 'खतरों के खिलाड़ी' मध्ये दिसणार आहेत.

Six Bigg Boss Editions
Veen Doghantali Hi Tutena : मला वेड लागले प्रेमाचे...; समर-स्वानंदीचा रिमझिम पावसात रोमँटिक डान्स | VIDEO

६ भाषा आणि शोचे होस्ट

  • हिंदी: सलमान खान

  • तमिळ: विजय सेतुपती

  • तेलुगु: नागार्जुनने

  • कन्नड: किच्चा सुदीपा

  • मल्याळम: मोहनलाल

  • बांगला: सौरव गांगुली

'बिग बॉस २०' साठी कोणत्या नावांची चर्चा?

सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांनुसार हिंदी 'बिग बॉस २०' मध्ये फैसल शेख, रिधिमा गुप्ता, अंजली अरोरा, जन्नत जुबेर, उर्फी जावेद , अरबाज पटेल, भव्य सिंह हे चेहरे पाहायला मिळू शकतात.

Six Bigg Boss Editions
John Abraham : मुंबईतील सर्वात पॉश भागात जॉन अब्राहमचा नवा बंगला, किंमत वाचून डोळे विस्फारतील

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com