Veen Doghantali Hi Tutena : मला वेड लागले प्रेमाचे...; समर-स्वानंदीचा रिमझिम पावसात रोमँटिक डान्स | VIDEO

Veen Doghantali Hi Tutena Marathi Serial Update : 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत सध्या समर-स्वानंदीचे प्रेम फुलताना दिसत आहे. दोघांनी भर पावसात रोमँटिक डान्स केला. मालिकेत पुढे काय घडणार, जाणून घेऊयात.
Veen Doghantali Hi Tutena Marathi Serial Update
Veen Doghantali Hi Tutena saam tv
Published On
Summary

समर-स्वानंदीच्या आयुष्यात प्रेमाचा पाऊस

रिमझिम पावसात समर-स्वानंदीने केला रोमँटिक डान्स

समर-स्वानंदीच्या आयुष्यात नवं वादळ येणार

'वीण दोघांतली ही तुटेना' ही प्रेक्षकांची लोकप्रिय मालिका आहे. वटपौर्णिमेपासून समर-स्वानंदीच्या नात्याला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. दोघेही एकमेकांकडे आपल्या प्रेमाची कबुली देतात आणि नव्या नात्याची सुरुवात करतात. मात्र सुष्मिता घरी आल्यापासून मल्लिका सुष्मिता आणि अंशुमनच्या मदतीने दोघांच्या नात्यात फुट पाडण्याचा प्रयत्न करताना दिसते. मात्र समर-स्वानंदी कायम एकमेकांशी बाजू घेताना दिसतात. स्वानंदी मल्लिकाचे सर्व प्लान फ्लॉप करते. अशात मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे.

व्हिडीओत नेमकं काय?

'वीण दोघांतली ही तुटेना' चा नवीन प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता की, समर आणि स्वानंदी गाडीने बाहेर जात असतात. मस्त पाऊस सुरू असतो. तेव्हा स्वानंदी समरला बोलते की, "तुम्हाला इतक्या छान पावसात भिजावेसं कसं वाटतं नाही..." त्यावर समर बोलतो, "काही म्हणलात?" स्वानंदी पुन्हा बोलते की, "अहो, इतका छान पाऊस पडतोय बघा, तुम्हाला भिजावसं कसं वाटत नाही..." त्यावर आनंदाने समर बोलतो की, "तुम्ही बोलात..." अखेर "मी भिजायला जाते..." असे म्हणत स्वानंदी गाडी बाहेर उतरते आणि पावसात भिजायला लागते. त्यानंतर समर देखील पावसात भिजतो. त्यानंतर समर- स्वानंदी पावसात रोमँटिक डान्स करतात. समर स्वानंदीचा हात पकडतो आणि तिला जवळ ओढतो. दोघेही पावसाचा मनमुराद आनंद घेताना दिसतात.

व्हिडीओला खूपच रोमँटिक कॅप्शन देण्यात आले आहे. लिहिलं की, "समर आणि स्वानंदीच्या आयुष्यात बरसणार प्रेमाचा पाऊस!" 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेचे येणाऱ्या भागांमध्ये समर-स्वानंदीचे नाते हळूहळू खुलताना दिसणार आहे. या व्हिडीओवर प्रेक्षक भरभरून कमेंट्सचा वर्षाव करत आहे. 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिका झी मराठी वाहिनीवर संध्याकाळी 7:30 वाजता पाहायला मिळते.

समरच्या आजीचे किडनॅप

आता येणाऱ्या भागांमध्ये एकीकडे समर-स्वानंदीची प्यारवाली लव्ह स्टोरी दिसत असताना दुसरीकडे राजवाडेंच्या कुटुंबावर मोठे संकट येणार आहे. समरच्या आजीला काही गुंड किडनॅप करतात आणि समरकडे २५ लाखांची मागणी करतात. पैसे दिले नाही तर आजीला मारून टाकू अशी धमकी देखील देतात. आता समर-स्वानंदी या संकटावर कसे मात करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Veen Doghantali Hi Tutena Marathi Serial Update
Famous Singer : प्रसिद्ध गायिकेची Live कॉन्सर्ट दरम्यान छेडछाड; चाहत्यांनी अंगाला नको तिथे स्पर्श केला, VIDEO व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com