Famous Singer : प्रसिद्ध गायिकेची Live कॉन्सर्ट दरम्यान छेडछाड; चाहत्यांनी अंगाला नको तिथे स्पर्श केला, VIDEO व्हायरल

Famous Singer Viral Video : प्रसिद्ध गायिकेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान चाहत्यांनी गायिकेसोबत गैरवर्तन केल्याचे दिसत आहे.
Famous Singer Viral Video
Famous Singersaam tv
Published On
Summary

लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान गायिकेची छेडछाड

चाहत्यांनी गर्दीत गायिकेच्या अंगाला केला स्पर्श

सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा संताप

'धुरंधर' स्टार प्रसिद्ध गायिका जस्मिन सँडलास सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आहे. अलिकडेच तिने लाइव्ह कॉन्सर्टमध्ये आपल्या प्रेमाची कबुली देऊन चाहत्यांना सरप्राइज दिले. तिचा बॉयफ्रेंडसोबतचा व्हिडीओ खूप व्हायरल झाला. अशात आता जस्मिन सँडलासचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात तिच्यासोबत वाईट घटना घडताना दिसत आहे. ज्यामुळे चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

गायिका जस्मिन सँडलास सध्या 'द ड्रीम गर्ल इंडिया' या दौऱ्यावर आहे. डेहराडूनमधील एका कॉन्सर्टनंतरचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे पंजाबी गायिका जस्मिन सँडलासच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या व्हिडिओमध्ये परफॉर्मन्सनंतर स्टेजजवळचा एक तणावपूर्ण क्षण दिसून येत आहे. व्हिडीओत गायिका चाहत्यांशी संवाद साधताना, त्यांच्याकडून फुले, कार्ड घेताना दिसत आहे.

जस्मिनने 'परेड ग्राउंड'वर आयोजित केलेल्या कॉन्सर्टमध्ये परफॉर्म केले. जिथे तिला पाहण्यासाठी हजारो लोक जमले होते. कार्यक्रमादरम्यान तिने 'सिप सिप', 'शरारत' आणि 'लवन' यांसारखी तिची लोकप्रिय गाणी गायली. व्हिडिओमध्ये पहिल्या रांगेत उभे असलेले उत्साही चाहते जल्लोष करताना, हातात गुलाब धरून गायिकेच्या दिशेने हात पुढे करताना दिसत आहेत. फुले स्वीकारण्यासाठी आणि तिला भेटण्यासाठी वाट पाहणाऱ्यांना प्रतिसाद देण्यासाठी जस्मिन बॅरिकेडच्या जवळ जाते. मात्र, ज्या सोशल मीडिया युजरने हा व्हिडिओ शेअर केला, त्यांच्या म्हणण्यानुसार, गर्दीने तिला वेढल्यामुळे परिस्थिती वेगाने बिघडली. या पोस्टमध्ये असा आरोप करण्यात आला आहे की, चाहत्यांशी बोलताना प्रेक्षकांमधील काही लोकांनी गायिकेला अयोग्यरित्या स्पर्श केला.

सोशल मीडिया युजरने लिहिलं की, "प्रसिद्ध गायिका जॅस्मिन सँडलास यांना लोकांच्या गर्दीने वेढले आणि त्यांच्याशी अयोग्य वर्तन (अयोग्य स्पर्श) केले. त्या डेहराडूनमध्ये परफॉर्मन्स करत होत्या. एक गाणे संपल्यानंतर, पुढच्या रांगेतील लोकांनी त्यांना दाद दिली, गुलाबाची फुले देऊ केली आणि हात मिळवले. फुले स्वीकारण्यासाठी आणि चाहत्यांशी हात मिळवण्यासाठी गायिका थोडे खाली आल्या, परंतु काही लोकांनी आपली विकृत वृत्ती दाखवत त्यांना अयोग्यरित्या स्पर्श केले. आपण इतरांचा आदर केला पाहिजे आणि योग्य वर्तन केले पाहिजे. गर्दीला हे कधी समजेल, हे केवळ देवालाच ठाऊक. " नेटकरी या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडत आहे.

Famous Singer Viral Video
Famous Actress : एक फोन अन् अकाउंट रिकामे, प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईची सायबर फसवणूक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com