Shreya Maskar
पावसाळ्यात आपल्याला कायम काहीतरी चटपटीत खावेसे वाटते. अशावेळी बाहेरचे जंक आणि स्ट्रीट फूड खाण्यापेक्षा घरीच झटपट मसाला सँडविच पाव बनावा. रेसिपी नोट करा.
मसाला सँडविच पाव बनवण्यासाठी काकडी, शिमला मिरची , टोमॅटो, कांदा , बीट , लाल सुक्या मिरच्या , लसूण , मीठ, चीज, वेफर्स , धने पावडर, बटर, पाव भाजी मसाला, कोथिंबीर आणि चाट मसाला इत्यादी साहित्य लागते.
मसाला सँडविच पाव बनवण्यासाठी सर्वप्रथम काकडी, शिमला मिरची, टोमॅटो, कांदा आणि बीट गोलाकार आकारात कापून घ्या.
गरम पाण्यात लाल सुक्या मिरच्या घालून उकळवून घ्या. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात भिजवलेल्या सुक्या लाल मिरच्या, लसूण , मीठ घालून बारीक पेस्ट तयार करा.
पॅनमध्ये बटर टाका आणि त्यात पाव भाजी मसाला, लाल मिरच्यांची पेस्ट मिक्स करा. तयार मिश्रण पावात भरा आणि पाव फ्राय करा.
बटरमध्ये पाव चांगले मिक्स झाल्यावर त्यात काकडी, शिमला मिरची, टोमॅटो, कांदा आणि बीट घाला. तुम्ही यात तुमच्या आवडीनुसार भाज्या देखील टाकू शकता.
शेवटी यात आवडीनुसार चीज, वेफर्स टाका आणि गरमागरम मसाला सँडविच पावचा आस्वाद घ्या. संध्याकाळच्या नाश्त्यासाठी ही परफेक्ट रेसिपी आहे.
मसाला सँडविच पावचा गरमागरम चहासोबत आस्वाद घ्या. तुम्ही यात उकडलेला मका देखील टाकू शकता.