Weight Loss Ice Cream Recipe : आईस्क्रीम खाऊनही वजन होईल कमी, वाचा 'ही' सीक्रेट रेसिपी

Shreya Maskar

वजन कमी

वजन कमी करण्यासाठी केळ खूप फायदेशीर आहे. केळीमुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि अतिखाण्यावर नियंत्रण राहते.

lose weight | pinterest

केळीमधील पोषक घटक

केळीमध्ये कमी कॅलरीज आणि फायबर असते, जे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. तसेच केळ्यामध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन बी६ यांसारखी आवश्यक पोषक तत्वे असतात. फायबरमुळे पचनक्रिया सुधारते.

Nutrients in bananas | pinterest

केळी आईस्क्रीम

केळीमध्ये नैसर्गिक गोडवा असतो, ज्यामुळे यात साखर टाकायची गरज भासत नाही. तसेच केळी आईस्क्रीम बनवण्यासाठी छोटी केळी, दालचिनी, मध, कोको पावडर,चिया सीड्स, सुकामेवा हे पदार्थ लागतात.

Banana ice cream | pinterest

पिकलेली केळी

केळीचा आईस्क्रीम बनवण्यासाठी सर्वप्रथम २ पिकलेली केळी घेऊन त्याचे तुकडे करा. २-३ तासांसाठी फ्रीझरमध्ये ठेवा.

Ripe banana | pinterest

दालचिनी

गोठवलेली केळी ब्लेंडरमध्ये घालून त्याची गुळगुळीत पेस्ट बनवा. ही पेस्ट एका बाऊलमध्ये काढा आणि त्यात कोको पावडर , दालचिनी पावडर टाकून मिक्स करा.

Cinnamon | pinterest

चिया सीड्स

त्यानंतर मिश्रणात १ छोटा चमचा मध मिक्स करा. आईस्क्रीम अधिक हेल्दी बनवण्यासाठी यात चिया सीड्स आणि सुका मेव्याचे तुकडे मिक्स करा.

Chia seeds | pinterest

आईस्क्रीम सेट करा

तयार मिश्रण आईस्क्रीम ट्रेमध्ये ओतून आईस्क्रीम सेट होण्यासाठी फ्रीझरमध्ये २-३ तास ठेवून द्या. व्यायाम केल्यानंतर काही वेळाने तुम्ही केळीचा आईस्क्रीम खाऊ शकता. मात्र याचे प्रमाण मर्यादित असावे.

Set the ice cream | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : डाएटमध्ये नक्की खा पालकची 'ही' रेसिपी, फक्त १५ दिवसांत वजन होईल कमी

Weight Loss Recipe | saam tv
येथे क्लिक करा...