जॉन अब्राहमची रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी गुंतवणूक
मुंबईत खरेदी केला आलिशान बंगला
मुंबईत पॉश एरियात अभिनेत्याने प्रॉपर्टी खरेदी केली
रणबीर कपूरनंतर आणखी एका बॉलिवूड स्टारने प्रॉपर्टी खरेदी केली आहे. अभिनेता जॉन अब्राहमने रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली आहे. जॉन अब्राहमने वांद्रे पश्चिम भागात ८४ कोटी रुपयांना एक बंगला खरेदी केल्याचे वृत्त समोर आले आहे. या बंगल्याच्या खरेदीनंतर जॉन अब्राहमच्या प्रॉपर्टीत आणखी वाढ झाली आहे.
TOI च्या वृत्तानुसार, 'लियासेस फोरस'द्वारे मिळवलेल्या मालमत्ता नोंदणी कागदपत्रांनुसार, जॉन अब्राहमचा हा बंगला वांद्रे पश्चिममधील 'सेंट मार्टिन रोड'वर आहे. ही मालमत्ता १,०१७.६० चौरस मीटरच्या भूखंडावर वसलेली आहे. यात सुमारे १९३.१२ चौरस मीटरचे 'बिल्ट-अप' क्षेत्रफळ असलेला मुख्य बंगला आणि सुमारे ३१.५० चौरस मीटरचा 'आउटहाऊस' यांचा समावेश आहे.हा व्यवहार १४ जुलै २०२६ रोजी एकूण ८४ कोटी रुपयांच्या मोबदल्यात नोंदवला गेला. ही खरेदी पूर्ण करण्यासाठी जॉन अब्राहमने ५.०४ कोटी रुपये मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्युटी) म्हणून भरले.
ही 'फ्रीहोल्ड' (पूर्ण मालकी हक्काची) मालमत्ता नौशीर एरच डिवित्रे, फ्रेडन एरच डिवित्रे, क्रिस्टल फिरोज डिवित्रे आणि एरच फिरोज डिवित्रे यांच्याकडून नोंदणीकृत हस्तांतरण दस्तऐवजाद्वारे खरेदी करण्यात आली. या व्यवहारावर अद्याप अभिनेते आणि विक्रेते यांपैकी कोणीही माहिती दिली नाही.
जॉन अब्राहम अलिकडेच 'द डिप्लोमॅट' या राजकीय थरारपटात आणि त्यानंतर 'तेहरान' या ॲक्शन-प्रधान मनोरंजक चित्रपटात दिसला. जॉन अब्राहम लवकरच राकेश मारिया यांच्या बायोपिकमध्ये झळकणार आहे. जॉनच्या चित्रपटाचे प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.