Bandra Fort : मुंबईचा ऐतिहासिक खजिना! 'वांद्रे' किल्ल्याचे जुने नाव काय?

Shreya Maskar

वांद्रे किल्ला

वांद्रे किल्ला (कॅस्टेला डी अगुआडा) हा मुंबईतील वांद्रे पश्चिम भागात वसलेला आहे. तुम्ही पावसाळ्यात येथे वीकेंडला नक्की भेट द्या.

Bandra Fort | google

दुसरे नाव काय?

वांद्रे किल्ला ज्याला 'कॅस्टेला डी अगुआडा' (Castella de Aguada) म्हणून ओळखले जाते.कॅस्टेला डी अगुआडा या नावाचा अर्थ 'पाण्याच्या स्रोताचा किल्ला' (Fort of the Waterpoint) असा होतो. पोर्तुगीज भाषेत 'कॅस्टेला' म्हणजे किल्ला आणि 'अगुआडा' म्हणजे पाण्याची जागा

What is another name? | google

किल्ला कधी बांधला?

वांद्रे किल्ला पोर्तुगीजांनी १६४० मध्ये एक मोक्याचा टेहळणी बुरूज (वॉचटावर) म्हणून बांधला होता. हा किल्ला उत्तरेकडील सागरी मार्ग आणि माहीम खाडीच्या संरक्षणासाठी बांधला होता.

When was the fort built? | google

नावाचा अर्थ

वांद्रे किल्ल्याला 'कॅस्टेला डी अगुआडा' हे नाव तेथील गोड्या पाण्याच्या नैसर्गिक झऱ्यावरून पडले होते, ज्याचा उपयोग तेथून जाणाऱ्या पोर्तुगीज जहाजांना पाणी पुरवण्यासाठी केला जात असे.

Meaning of the name | google

इतर नावे

बांधकामाच्या वेळी या किल्ल्याला 'फोर्ट डी बांदोरा' (Forte de Bandora) असेही संबोधले जात असे.

other name | google

कसं जाल?

वांद्रे किल्ल्याला पोहचण्यासाठी वेस्टर्न लाइनवरून ट्रेन पकडून वांद्रे स्टेशनला उतरा. पुढे रिक्षाने वांद्रे किल्ल्याजवळ पोहचाल.

how do you go | google

निसर्ग सौंदर्य

वांद्रे किल्ल्यावर ऐतिहासिक काळात सात तोफा आणि इतर लहान शस्त्रे तैनात होती. येथून अरबी समुद्र आणि वांद्रे-वरळी सी-लिंकचे विहंगम दृश्य दिसते.

Beauty of nature | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : सांगली ट्रिप प्लान करताय? कृष्णा नदीच्या काठावर वसलेला 'हा' ऐतिहासिक किल्ला पाहाच

Sangli Fort | saam tv
येथे क्लिक करा...