Sangli Fort : सांगली ट्रिप प्लान करताय? कृष्णा नदीच्या काठावर वसलेला 'हा' ऐतिहासिक किल्ला पाहाच

Shreya Maskar

सांगली किल्ला

सांगली किल्ला म्हणजेच गणेश दुर्ग होय. सांगली शहराच्या मध्यभागी हा ऐतिहासिक भुईकोट किल्ला आहे. सांगली किल्ला कृष्णा नदीकाठी उभा आहे.

Sangli Fort | google

गणेश दुर्ग

गणेश दुर्ग १९ व्या शतकातील आहे. १८०० च्या दशकाच्या सुरुवातीला श्रीमंत आप्पासाहेब पटवर्धन यांनी हा किल्ला बांधला. या किल्ल्यात १७५ वर्षे जुने श्री गणपती मंदिर आहे.

Ganesh Durg | google

किल्ल्याचा आकार

गणेश दुर्ग किल्ला अष्टकोनी आकाराचा आहे. आतील भागात मध्यभागी मोकळी जागा असलेला एक विशाल आयताकृती अंगण आहे.

The size of the fort | google

राजधानी

गणेश दुर्ग किल्ला पटवर्धन संस्थानाची राजधानी होता. सांगली किल्ला सुंदर दरबार हॉल, २१ फूट उंच मुख्य प्रवेशद्वार आणि सांगली संग्रहालय यासाठी प्रसिद्ध आहे.

Capital | google

किल्ल्याची उंची

२१ फूट उंच असलेल्या या मुख्य प्रवेशद्वारावर ऐतिहासिक भित्तिचित्रे आहेत. गणेश दुर्ग किल्ला सुमारे २० एकरांच्या विस्तीर्ण क्षेत्रावर पसरलेला आहे. ऐतिहासिक काळात हा किल्ला एका रुंद खंदकाने वेढलेला होता.

Height of the fort | google

सांगली संग्रहालय

किल्ल्याच्या आवारात असलेल्या संग्रहालयात ऐतिहासिक वस्तू, पारंपरिक भारतीय कलाकुसर आणि सुंदर चित्रांचा दुर्मिळ संग्रह पाहायला मिळतो. येथे वास्तुकलेचा सुंदर नजारा पाहाल.

Sangli Museum | google

कसं जाल?

मुंबईहून सांगलीपर्यंत ट्रेनने प्रवास करा. पुढे रिक्षाने गणेश दुर्गला पोहचा. कुटुंबासोबत तुम्ही येथे नक्की फिरायला जा.

how do you go | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : सह्याद्रीतील अभेद्य लोखंडी दुर्ग! मुंबईहून लोहगड किल्ल्याला कसं जाल?

Lohagad Fort | saam tv
येथे क्लिक करा...