Salman Khan : भाऊंच्या त्या व्हिडिओमुळे चाहते होते चिंतेत, आता स्वतः सलमान खानने PHOTO शेअर करत विचारला 'हा' प्रश्न

Salman Khan New Photoshoot : सलमान खानने नुकतेच सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्याने आपल्या चाहत्यांना एक प्रश्न विचारला आहे.
Salman Khan New Photoshoot
Salman Khansaam tv
Published On
Summary

सलमान खानने शेअर केले नव्या फोटोशूटचे फोटोज्

सलमानच्या तब्येतीची चाहत्यांना चिंता

भाईजानने चाहत्यांना विचारला प्रश्न

बॉलिवूडचा भाईजान कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सलमान खान सध्या सोशल मीडियावर देखील चांगलेच सक्रिय असतात. अलिकडेच त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात सलमानच्या लूकने त्यांच्या तब्येतीची चर्चा सोशल मीडियावर रंगली. या व्हिडीओत सलमान खान सडपातळ दिसत होता. तसेच त्याचा चेहरा निस्तेज वाटत होता. यामुळे नेटकरी फक्त सलमान खानला काय झाले, असाच प्रश्न करत होते. अशात आता भाईजानने क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सलमान खानने रात्री आपले नवीन हटके फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले. ज्यात भाईजानचा स्वॅग पाहून चाहते भारावून गेले आहेत. फोटो बॅक अँड व्हाइट थीममध्ये पाहायला मिळत आहे. सलमान खानने काळ्या रंगाचे शर्ट त्यावर ब्राऊन रंगाचे जॅकेट आणि डोक्यावर हॅट परिधान केली आहे. तसेच या फोटोंना सलमान खानने कॅप्शन देऊन चाहत्यांना प्रश्न केला आहे. त्याने लिहिलं की, "आप लोगों की तबियत कैसी है?" (तुमची सर्वांची तब्येत कशी आहे?)

सलमान खानने शेअर केलेल्या व्हिडीओवर चाहते कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव करत आहेत. वयाच्या 60 व्या वर्षी देखील सलमान खान फिट अँड फाइन पाहायला मिळतो. त्याला एक नजर पाहण्यासाठी करोडो चाहते दिवाने आहेत.

सलमान खानचे आगामी चित्रपट

सलमान खानचा 'मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस' चित्रपट १४ ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. सलमान खान सध्या तेलुगू चित्रपट दिग्दर्शक वामशी पेडिपल्ली यांच्यासोबत चित्रपटाचे चित्रीकरण करत आहेत. नुकताच सलमान खान रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटात दिसला.

Salman Khan New Photoshoot
Fact Check: थलापती विजय खरंच जंतर-मंतरवर पोहोचले? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य अखेर समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com