काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यांना अटक; राजकारणात खळबळ

Punjab Congress Protest Sachin Pilot Partap Singh Bajwa Detained: पंजाबमध्ये काँग्रेसच्या आंदोलनाला हिंसक वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली. सचिन पायलट, प्रताप सिंह बाजवा यांच्यासह अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. आंदोलकांवर वॉटर कॅननचा वापर करण्यात आला.
Sachin Pilot detained during Punjab Congress protest in Chandigarh
Sachin Pilot detained during Punjab Congress protest in Chandigarhsaam tv
Published On

पंजाबमध्ये काँग्रेसने मंगळवारी केलेल्या आंदोलनादरम्यान परिस्थिती अधिकच तणावपूर्ण बनली. अर्थमंत्री हरपाल सिंह यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन सुरू असताना पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी चंदीगड पोलिसांनी आंदोलकांवर पाण्याचा मारा केला. सेक्टर-15 येथील पंजाब काँग्रेस भवनातून आंदोलन पुढे जाऊ नयेत, यासाठी पोलिसांनी बॅरिकेडिंग केली होती. मात्र आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी वॉटर कननचा वापर केला. या आंदोलनात पंजाब काँग्रेसचे नवे प्रभारी सचिन पायलट, प्रदेश कॉँग्रेस अध्यक्ष अमरिदर सिंह राजा वडिग, विरोधी पक्षेनेते प्रताप सिंह बाजवा यांच्यासह पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.

Sachin Pilot detained during Punjab Congress protest in Chandigarh
Congress: काँग्रेसच्या बड्या नेत्याला भररस्त्यात बेदम मारहाण, VIDEO होतोय व्हायरल; राजकारणात खळबळ

सचिन पायलट आणि राजा वडिंग यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते मंत्री हरपाल सिंह चीमा यांच्या विरोधात घोषणाबाजी करत पुढे जात होते. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी अनेक ठिकाणी बॅरिकेड्स लावले होते. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सातत्याने वॉटर कॅननचा वापर केला. या कारवाईदरम्यान काँग्रेसच्या अनेक नेते आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. सचिन पायलट, विरोधी पक्षनेते प्रताप सिंह बाजवा यांच्यासह पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं.

Sachin Pilot detained during Punjab Congress protest in Chandigarh
Political News: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला NHRC ची नोटीस, ५ कोटींची लाच घेतल्याचा आरोप

या आंदोलनामुळे सेक्टर-15 येथील काँग्रेस भवनासमोर तसेच सेक्टर-15/16 चौक परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. गुलजार सिंह यांच्या मृत्यूच्या प्रकरणात मंत्री हरपाल सिंह चीमा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात येत आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी काँग्रेसची मागणी आहे. याच मागणीसाठी काँग्रेसने हरपाल सिंह चीमा यांच्या निवासस्थानाच्या दिशेने मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com