Political News: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला NHRC ची नोटीस, ५ कोटींची लाच घेतल्याचा आरोप

NHRC Notice to Punjab CM Bhagwant Mann Wife: पंजाबजे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या बायकोला एनएचआरसीने नोटीस बजावली आहे. ५ कोटींची लाच घेतल्याप्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे.
Political News: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला NHRC ची नोटीस, ५ कोटींची लाच घेतल्याचा आरोप
Punjab CM Saam Tv
Published On
  • पंजाबमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली

  • भगवंत मान यांच्या पत्नीला एनएचआरसीची नोटीस

  • भगवंत मान यांच्या पत्नीवर लाच घेतल्याचा आरोप

  • ५ कोटींच्या लाच प्रकरणात एनएचआरसीने बजावली नोटीस

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या पत्नीच्या अडचणीत वाढ झाली आहे. भगवंत मान यांच्या पत्नीला राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाने नोटीस बजावली आहे. त्यांच्यावर ५ कोटींची लाच घेतल्याचा आरोप आहे. एनएच आरसीने या प्रकरणी १५ दिवसांच्या आत कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला नोटीस आल्यामुळे या घटनेची राज्यात जोरदार चर्चा होत आहे.

पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश रणजित सिंग यांनी आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीमध्ये त्यांनी असे सांगितले की, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या पत्नीने ५ लाख रुपयांच्या लाचेच्या बदल्यामध्ये बलात्काराचे प्रकरण दाबण्याचा किंवा दडपण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत आयोगाने केंद्रीय गृह मंत्रालयाच्या महिला सुरक्षा विभागाला याची माहिती दिली.

Political News: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला NHRC ची नोटीस, ५ कोटींची लाच घेतल्याचा आरोप
Kalyan Politics: दुर्गाडी मंदिर प्रवेश बंदीच्या मुद्द्यावरून राजकारण तापले; ठाकरे गटाचा भाजप आणि शिंदे गटावर हल्लाबोल

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या सदस्या प्रियांक कानूंगो यांनी या प्रकरणावर चिंता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, 'जेव्हा महिला आणि मुलांच्या सुरक्षेसारख्या संवेदनशील प्रकरणात राज्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी संबंधित व्यक्तीवर असे आरोप केले जातात. तेव्हा ही अत्यंत गंभीर चिंतेची बाब आहे. आम्ही पंजाबचे मुख्य सचिव आणि डीजीपी यांना या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. अहवाल मिळाल्यानंतरच आयोग पुढील कारवाई करेल.'

Political News: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला NHRC ची नोटीस, ५ कोटींची लाच घेतल्याचा आरोप
पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

प्रियांक कानूंगो अधिकाऱ्यांना इशारा म्हणाल्या की, 'अधिकाऱ्यांनी संविधानाने त्यांना दिलेल्या अधिकारांचा वापर केवळ जनतेच्या कल्याणासाठीच करावा. जर ते कोणत्याही प्रकारच्या राजकीय दबावाखाली काम करत असतली तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. आम्ही त्यांना चौकशी करून अहवाल सादर करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे.' राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाने स्पष्ट केले की, पंजाब पोलिस आणि प्रशासनाकडून सविस्तर अहवाल मिळाल्यानंतरच निष्पक्ष चौकशी प्रक्रिया पुढे नेली जाईल.

Political News: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला NHRC ची नोटीस, ५ कोटींची लाच घेतल्याचा आरोप
Politics : राजकारणात मोठी उलथापालथ! माजी मुख्यमंत्र्यांच्या निष्ठावान नेत्यानं साथ सोडली; भाजपने डाव टाकला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com