Arvind Kejriwal: दिल्लीत E20 पेट्रोलविरोधात आंदोलन; PM हाउसकडे जात असतानाच केजरीवालांना पोलिसांनी रोखलं, रस्त्यावरच ठिय्या

AAP Protest: E20 पेट्रोल लागू करण्याच्या निर्णयाविरोधात अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे मोर्चा काढला. दिल्ली पोलिसांनी मोर्चा रोखल्यानंतर आप नेत्यांनी धरणे आंदोलन सुरू केले. ट्रान्सपोर्ट युनियनही संसद मोर्चाच्या तयारीत असून दिल्लीत राजकीय वातावरण तापलं आहे.
Arvind Kejriwal
Arvind Kejriwalsaam tv
Published On

देशभरात E20 पेट्रोल लागू करण्याच्या निर्णयाविरोधात दिल्लीत आज मोठी राजकीय घडमोड सुरू आहे. माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे मोर्चा काढला असून या मुद्द्यावर राजधानीत वातावरण तापलंय. दुसरीकडे ट्रान्सपोर्ट युनियननेही E20 पेट्रोलच्या विरोधात संसदेकडे कूच करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे E20 इंधनाच्या मुद्द्यावरचा वाद आणखी तीव्र होताना दिसत आहे.

काय आहे आपचा आरोप?

आम आदमी पक्षाचा आरोप आहे की, देशभरात E20 पेट्रोल लागू करण्याचा निर्णय घेताना केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिक आणि कोट्यवधी वाहनधारकांच्या अडचणींचा पुरेसा विचार केलेला नाही. खास करून जुन्या वाहनांवर E20 पेट्रोलचा काय परिणाम होईल याबाबत नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. या सर्व मुद्द्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप पक्षाने केला आहे.

Arvind Kejriwal
Abhijeet Dipke : "...तो पाकिस्तानी एजंट" अभिजित दीपिकेला अटक करा, प्रसिद्ध इंफ्लुएन्सरने केली पोलिसात तक्रार

याच पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या पक्ष कार्यालयातून समर्थकांसह पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे मोर्चा सुरू केला आहे. मोर्चा पुढे सरकत असताना दिल्ली पोलिसांनी फिरोजशाह रोडवर त्यांना अडवलंय. पोलिसांचं म्हणणं आहे की, या मोर्चासाठी आवश्यक परवानगी घेण्यात आलेली नव्हती.

मोर्चा रोखल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी माघार घेतलेली नाही. ते आपल्या पक्षाचे कार्यकर्ते आणि शेकडो समर्थकांसह फिरोजशाह रोडवरच रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत आहेत. त्यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Arvind Kejriwal
Cabinet Expansion: राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, १९ नव्या मंत्र्यांनी घेतली शपथ, कुणाची लागली मंत्रिपदी वर्णी?

अरविंद केजरीवाल, दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि शेकडो कार्यकर्त्यांसह धरणे आंदोलनाला बसले आहेत. केजरीवाल यांनी सांगितले की, "मी माझ्यासोबत २.३० लाखांहून अधिक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असलेलं निवेदन घेऊन आलो आहे. सरकारने जनतेवर जबरदस्तीने E20 पेट्रोल लादणं तातडीने थांबवावं. आम्ही याठिकाणी केवळ पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी आलो आहोत."

Arvind Kejriwal
मोठी बातमी! माजी उपमुख्यमंत्र्यांना अटक, राजकारणात खळबळ

दरम्यान, E20 पेट्रोलच्या विरोधात ट्रान्सपोर्ट युनियनचे आंदोलनही सुरू होण्याच्या तयारीत आहे. संसदेकडे कूच करण्याचा त्यांचा इशारा असल्याने दिल्लीत आज दिवसभर या मुद्द्यावर राजकीय आणि सामाजिक घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com