मोठी बातमी! माजी उपमुख्यमंत्र्यांना अटक, राजकारणात खळबळ

तामिळनाडूचे विरोधी पक्षनेते आणि डीएमके (DMK) नेते उदयनिधी स्टॅलिन यांच्या अडचणींत मोठी वाढ झाली आहे. त्यांना पोलिसांनी आज सकाळी चेन्नईतील घरातून अटक केली आहे.
Udhayanidhi Stalin detained
Udhayanidhi Stalin detained
Published On

Udhayanidhi Stalin On CM Vijay Trisha Krishnan : तामिळनाडूचे विरोधी पक्षनेते आणि माजी उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना अटक केली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री त्रिशा कृष्णन हिच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी त्यांच्यावर TVK कार्यकर्त्यांनी गुन्हा दाखल केला होता. त्या प्रकरणी आज तंजावूर पोलिसांनी स्टॅलिन यांना चेन्नईतील घरातून अटक केली. स्टॅलिन यांना अटक केल्यानंतर तामिळनाडूमध्ये डीएमके कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन आणि घोषणाबाजी केली.

तंजावूरमधील एका आंदोलनादरम्यान उदयनिधी स्टॅलिन यांनी अभिनेत्रीवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप आहे. या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात प्रचंड गदारोळ उडाला. महिला संघटनांनी आणि विरोधी पक्षांनी उदयनिधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. या प्रकरणी तक्रार दाखल होताच पोलिसांनी उदयनिधी स्टॅलिन यांना अटक करण्यात आली.

Udhayanidhi Stalin detained
Maharashtra Politics : सुनेत्रा पवारांचा 'गुंगी गुडीया' उल्लेख; काँग्रेसच्या पोस्टमुळे महाराष्ट्रात राजकारण तापले

पीटीआय (PTI) या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कावेरी पाणीप्रश्नावरून आयोजित करण्यात आलेल्या एका सार्वजनिक आंदोलनाला उदयनिधी स्टॅलिन संबोधित करत होते. आपल्या भाषणात त्यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी बोलताना अभिनेत्री तृषा कृष्णन हिच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली. त्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या. त्या प्रकरणी टीव्हीके कार्यकर्त्यांनी स्टॅलिन यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

नेमकं काय झालं?

भाषणादरम्यान गर्दीतील काही जण अचानक "त्रिशा, त्रिशा" अशा घोषणा देऊ लागले. त्यावर क्षणभर थांबून उदयनिधी म्हणाले, "पाणी इतर कुठे पोहोचो वा न पोहोचो, ते तिथे पोहोचायलाच हवे..." मात्र, वाद निर्माण होताच, "मी कावेरीच्या पाण्याबद्दलच बोलत होतो," असा स्पष्टीकरणवजा खुलासा त्यांनी केला.

Udhayanidhi Stalin detained
Gold Price Today: खरेदीदारांना मोठा दिलासा! आज सोन्याच्या दरात घसरण; पाहा तुमच्या शहरातील २४, २२ आणि १८ कॅरेटचे ताजे दर

या प्रकरणात अटकेची टांगती तलवार असल्याने उदयनिधी यांनी मद्रास उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. न्यायमूर्ती जी. के. इलंथिरैयन यांच्यासमोर यावर तातडीने सुनावणी झाली. न्यायालयाने या याचिकेची दखल घेत सुनावणी पूर्ण होईपर्यंत पोलिसांना कोणतीही घाईघाईने किंवा कठोर कारवाई न करण्याचे तोंडी निर्देश दिल्याचे समजतेय.

दरम्यान, या संपूर्ण कारवाईनंतर पत्रकारांशी बोलताना उदयनिधी यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. हा गुन्हा पूर्णपणे 'बनावट' असून आपण याविरोधात कायदेशीर लढा देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, "टीव्हीके (TVK) सरकार सत्तेत आल्यापासून डीएमके (DMK) आमदारांवर जाणीवपूर्वक बनावट गुन्हे दाखल केले जात आहेत आणि राजकीय घोडेबाजार सुरू आहे," असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com