प्रमोद जगताप, साम टीव्ही
Panjab Politics Latest News: अरविंद केजरीवाल यांचं आम आदमी पार्टीचं सरकार असलेल्या पंजाबमध्ये पुन्हा एकदा राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार अशी वादाची ठिणगी पडल्याची माहिती आहे. मागितलेली माहिती राज्य सरकार देत नसल्याचा दावा राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी केला आहे. इतकंच नाही, तर पंजाब मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा इशारा देखील पुरोहित यांनी दिला आहे. (Latest Marathi News)
गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल आणि पंजाबमधील आप सरकारमध्ये पत्रयुद्ध सुरू आहे. २२ जुलैला राज्यपालांनी मुख्यमंत्री मान यांना पत्र लिहून सरकारी शाळांमध्ये अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना वेळेवर शिष्यवृत्ती मिळत नसल्याने गळतीचे प्रमाण वाढल्याचा आरोप केला. तसेच याबाबत अहवाल मागितला होता.
या पत्रात राज्यपाल पुरोहित (Governor) यांनी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या घटनात्मक अधिकारांचं उल्लंघन निंदनीय आणि अन्याय करणारं असल्याचं म्हटलं होतं. राज्यपाल पुरोहित यांनी राज्याच्या सीमावर्ती भागाचा दौरा केला आणि त्यानंतर पंजाबमध्ये किराणा दुकानातही अमली पदार्थ (ड्रग्ज) मिळत असल्याचा गंभीर आरोप केला.
राज्यपालांनी ही बाब निर्देशनात आणून दिल्यानंतर NCRB ने काही दारूची दुकानही सील केली होती. त्यानंतर राज्यपालांनी या सगळ्याचा रिपोर्ट मागितला होता. दरम्यान, अहवाल मागितल्यानंतरही पंजाब सरकारने (Panjab Government) आपल्याला माहिती दिली नसल्याचा आरोप राज्यपालांनी केला आहे.
जर मागितलेली माहिती दिली जात नसेल तर हा संविधांनिक कर्तव्याचा अपमान आहे. त्यामुळं मला संविधान आणि कायद्यानुसार कारवाई करण्याशिवाय दुसरा पर्याय नसेल, असं म्हणत राज्यपाल बी एल पुरोहित यांनी पंजाबमध्ये थेट राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान, आम आदमी पार्टी आणि राज्यपाल यांच्यातील वादाची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी दिल्लीत देखील राज्यपाल आणि केजरीवाल सरकारमध्ये वाद झाला होता. महाराष्ट्रात देखील भगतसिंह कोश्यारी राज्यपाल असताना अशाच प्रकारचे वाद होत होते. ज्या राज्यात भाजपचे सरकार नाही, तिथं असा संघर्ष बघायला मिळत आहे.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.