Nawab Malik News: मोठी बातमी! नवाब मलिक यांचा शरद पवारांना पाठिंबा, सूत्रांची माहिती

Nawab Malik support to Sharad Pawar: मोठी बातमी! नवाब मलिक यांचा शरद पवारांना पाठिंबा, सूत्रांची माहिती
Nawab Malik support to Sharad Pawar
Nawab Malik support to Sharad PawarSaam Tv

Nawab Malik support to Sharad Pawar: एक मोठी बातमी समोर येत आहे. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी शरद पवार यांना आपला पाठींबा दिला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यातच अजित पवार गटाकडून मलिक यांची मुंबई अध्यक्षपदावरून मुक्तता करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवाब मलिक हे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार गटाच्या विविध नेत्यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी चर्चाही केली होती.

Nawab Malik support to Sharad Pawar
Sharad Pawar On ED Action: 'आमच्यावर धाड टाकू नका, थेट गोळी घाला', शरद पवारांचं सत्ताधाऱ्यांना थेट आव्हान

यानंतर नवाब मलिक राष्ट्रवादीच्या कुठल्या गटात जाणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. यातच त्यांनी शरद पवार गटाला आपला पाठींबा दर्शवला असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, नवाब मलिक हे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ते अजित पवार गटाला आपला पाठींबा देतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनंतर यावर पूर्ण विराम लागला आहे, असं म्हणता येईल.

Nawab Malik support to Sharad Pawar
Sharad Pawar Sabha: 'देशात बेरोजगारी वाढली, शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही', सामान्यांच्या प्रश्नांवरून शरद पवारांची मोदी सरकारवर टीका

यातच आज कोल्हापुरात शरद पवार यांची सभा पार पडली. या सभेतील आपल्या भाषणात शरद पवार यांनी नवाब मलिक यांचा उल्लेख केला आहे. हे सगळे नेते ईडीला घाबरले नाही, असं शरद पवार म्हणाले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com