

पेट्रोल, डिझेल आणि सोन्याचा वापर कमी करण्याचे मोदींकडून आवाहन
पंतप्रधान मोदींच्या विधानावर राहुल गांधी यांची टीका
पीएम मोदींच्या विधानामागे आर्थिक कारणे जाणून घ्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशवासीयांना पेट्रोल, डिझेल आणि सोन्याचा वापर कमी करण्याचं आवाहन केलं. पंतप्रधान मोदींच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. आवाहन केल्यानंतर विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी टीका केली. पंतप्रधान मोदींच्या विधानाचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. त्यांच्या आवाहनामागे महत्त्वाची जागतिक आणि आर्थिक कारणे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनावरून सेवानिवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी मोठं भाष्य केलं. पश्चिम आशियात अमेरिका-युक्रेन युद्ध आणि होर्मुझच्या खाडीतील तणावपूर्ण परिस्थितीमुळे भारतासमोर मोठे आर्थिक आव्हान उभे राहिले आहे. होर्मुझच्या युद्धामुळे जागतिक स्तरावर तेल आणि वायूच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झालाय.
'भारताचे २५% तेल आणि ५०% गॅस याच भागातून येतात. रशियन तेलाच्या किमतीही आता वाढल्या आहेत. केंद्र सरकारने २०२२ पासून विविध कर कपात आणि उपाययोजना करून इंधनाचे दर नियंत्रणात ठेवले होते. मात्र, आता आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढलेले दर पाहता, सरकारची दर कमी ठेवण्याची क्षमता संपत चालली आहे. इंधन दर वाढल्यास महागाईचा भडका उडण्याची शक्यता असल्याने जनतेने स्वतःहून बचतीचे पाऊल उचलणे गरजेचे आहे', असे त्यांनी सांगितले.
'प्रत्येक भारतीयाने इंधन वाचवल्यास देशावरील आर्थिक भार ३०% पर्यंत कमी होऊ शकतो. अमेरिका, चीन आणि युरोपमध्ये तेलाचे दर प्रचंड वाढलेले असताना भारताने ते आतापर्यंत स्थिर ठेवले होते. मात्र, भविष्यातील आर्थिक संकट टाळण्यासाठी आता प्रत्येक भारतीयाने 'इंधन सुरक्षा' आणि 'आर्थिक सुदृढतेसाठी' एक सैनिक म्हणून योगदान देण्याची वेळ आली आहे, असे महाजन यांनी सांगितले.
गॅस सिलिंडरवरील सबसिडी बंद केल्याने महिला वर्गांमध्ये उद्रेक
युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस सिलिंडरवरील सबसिडी बंद केली जाणार आहे. यामुळे महिला वर्गामध्ये मोठा उद्रेक झालेला पाहायला मिळतोय. नवीन कनेक्शन जर घ्यायचा असेल तर पुन्हा पैसे कोण देणार, त्यासाठी सरकारने काहीतरी वेगळी उपाययोजना करावी. आमचेच पैसे आम्हाला फिरवून देता. महागाई मोठ्या प्रमाणावर होत असताना सबसिडी बंद केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोन्या संदर्भात खरेदी करू नका असं सांगितले आहे, त्यावरही महिलांनी टीका केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.