पेट्रोल-डिझेलची बचत करा, सोनं खरेदी करू नका; मोदींच्या आवाहनावर महाराष्ट्राला काय वाटतं? मुंबई-पुण्यासह, नागपूरकरांची प्रतिक्रिया काय?

Maharashtra Citizens Reaction To Fuel Saving Appeal: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पेट्रोल-डिझेल बचत आणि सोने खरेदी टाळण्याच्या आवाहनावर महाराष्ट्रात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
Citizens in Maharashtra express mixed reactions to PM Modi’s appeal to reduce fuel consumption and avoid gold purchases.
Citizens in Maharashtra express mixed reactions to PM Modi’s appeal to reduce fuel consumption and avoid gold purchases.saam tv
Published On

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशाला उद्देशून एक भाषण केलं यामध्ये देशातील नागरिकांना आवाहन केलय की, पेट्रोल डिझेल वापर कमी, खाद्यतेल कमी वापरा, सोने खरेदी टाळा. तसेच परदेशी प्रवास टाळा, मेट्रो आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करा, वर्क फॉर्म होम करा. या सगळ्या गोष्टींवर पुणेकरांनी समिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोने खरेदी करायचे नाही तर लग्नकार्य कसे करायचे. पेट्रोल डिझेल वापरायचं नाही तर फिरायचे कसे स्वतः मंत्री आमदार मोदी सगळीकडे फिरतात. स्वतः मोदी परदेश दौरे करतात आम्ही का नाही करायचे. सोने खरेदी करण्यासाठी लोकांकडे आता पैसा हवा आहे. खूप मोठ्या प्रमाणात सोन्याचे दर वाढले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक वर्ष देशवासीयांनी सोनं खरेदी करू नये या निर्णयानंतर जळगाव शहरातील सुवर्णनगरीमध्ये सराफा असोसिएशनचे सचिव स्वरूप लुंकड यांनी साम टीव्हीला प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. व्यापाऱ्यांचं यामध्ये काही मोठे नुकसान होणार नाही. मोठे गुंतवणूकदार आणि साठेबाजी करणाऱ्यांसाठी पंतप्रधान यांनी हा निर्णय घेतला आहे. रुपयाचे मूल्य घसरत असल्यामुळे मोदीजींनी हा निर्णय घेतला आहे. देशाचे नागरिक म्हणून या निर्णयाचा मी स्वागत करतो.

Citizens in Maharashtra express mixed reactions to PM Modi’s appeal to reduce fuel consumption and avoid gold purchases.
Mumbai New Railway Line: मुंबईला मिळणार नवी रेल्वे लाइन; कल्याण-कसारा प्रवास होणार सुसाट; काय आहे प्लान?

पुना गाडगीळ ज्वेलर्सचे अभय गाडगीळ यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, काल मोदींनी पुढील एक वर्ष सोने खरेदी करू नका असे सांगितल्यानंतर व्यवसायावर फारसा परिणाम होणार नाही. सोने खरेदी हा प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा क्षण असतो. सणासुदीला लग्नकार्याला सोने खरेदी केले जातात. मात्र, याचा परिणाम झाला तर कारागीर, सोनार, कामगार यांच्यावर परिणाम होईल. पण सध्या तरी असं काही वाटत नाही. युद्धजन्य परिस्थिती थांबल्यामुळे सोनं खरेदी सध्या चांगली सुरू आहे. सोन्याचे दर गेले एक महिन्यापासून मोठ्या प्रमाणात वाढलेले नाहीत. त्यामुळे मोदी असं का म्हणाले कळत नाही. येणाऱ्या काळात याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे यासाठी थोडी वाट बघावी लागेल. अशी प्रतिक्रिया अभय गाडगीळ यांनी दिली आहे.

Citizens in Maharashtra express mixed reactions to PM Modi’s appeal to reduce fuel consumption and avoid gold purchases.
ST Bus Accident: काळाचा घाला! पाणी आणायला गेले अन् एसटीने बाप-लेकाला चिरडले; भंडाऱ्यात नागरिकांचा संताप

पेट्रोलचा वापर कमी करण्यावर सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया

नागरिकांनी पेट्रोल-डिझेलचा वापर कमीत कमी करावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. इंधन बचत व्हायलाच पाहिजे. विनाकारण बाहेर फिरायला नाही पाहिजे अशी प्रतिक्रिया मोदींच्या आवाहनानंतर जालन्यातील नागरिकांनी दिली आहे. तर सोने खरेदी करायला पैसा कोणाकडे आहे, गरीब लोक सोनं खरेदी करू शकत नाही, त्यामुळे लग्नामध्ये मंगळसूत्राची गरज आहे. तेवढच खरेदी करायचं असे देखील नागरिकांचे म्हणणे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com