PM Narendra Modi Speech On Alexa: यापुढे अलेक्सा आणि अ‍ॅमेझॉन म्युजिकवर ऐकता येणार पीएम मोदींचं भाषण, कसे ते बघा!

Ministry of Information and Broadcasting Tie Up Alexa and Amazon Music: माहिती प्रसारण मंत्रालय आणि अ‍ॅमेझॉनने यासाठी एक करार केला आहे. ज्याच्या माध्यमातून राष्ट्रीय महत्वाचे कार्यक्रम या सर्व प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार आहेत.
PM Narendra Modi Speech
PM Narendra Modi SpeechSaam Tv
Published On: 

PM Narendra Modi Speech: आतापर्यंत आपण सरकारी कार्यक्रम (Government Program), राष्ट्रपती (President of India) आणि पंतप्रधान (Prime Minister) यांची भाषणं टीव्ही किंवा रेडिओवरच ऐकली आहेत. आता यापुढे हे कार्यक्रम आणि भाषणं ऐकणं अधिक सोपं होणार आहे. आता या सर्व गोष्टी तुम्हाला अ‍ॅमेझॉन म्युजिक (Amazon Music) आणि अलेक्सावर (Alexa)देखील ऐकता येणार आहेत.

माहिती प्रसारण मंत्रालय आणि अ‍ॅमेझॉनने यासाठी एक करार केला आहे. ज्याच्या माध्यमातून राष्ट्रीय महत्वाचे कार्यक्रम या सर्व प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार आहेत. सरकार आणि अ‍ॅमेझॉन मल्टीडाइमेंशनल भागीदारीच्या अंतर्गत काम करेल.

PM Narendra Modi Speech
PM Narendra Modi Statement: 'बजरंगबलीप्रमाणे भाजपही शक्तीशाली होतोय', पीएम मोदी नेमकं काय म्हणाले, वाचा!

या कराराअंतर्गत अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ, अलेक्सा, अ‍ॅमेझॉन म्युजिक आणि अ‍ॅमेझॉन-ई मार्केटप्लसच्या माध्यमातून सरकारी कार्यक्रमांचे प्रसारण केले जाणार आहे. पब्लिकेशन डिव्हिजनची पुस्तकं आणि कॅटलॉगसोबतच भारताची संस्कृतीवर आधारित पुस्तकं अ‍ॅमेझॉन ई-कॉमर्सवर देखील उपलब्ध होणार आहेत. याव्यतिरिक्त अ‍ॅमेझॉन म्युझिक आणि अ‍ॅलेक्साच्या माध्यमातूनही भारतीय संगीताचासुद्धा प्रचार केला जाणार आहे.

PM Narendra Modi Speech
BJP MLA On Taj Mahal: ताजमहाल प्रेमाचे प्रतीक नाही, ते पाडून टाका; भाजप आमदाराची पंतप्रधान मोदींकडे अजब मागणी

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, या भागीदारीमुळे उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील दुवाही अधिक सुलभ होणार आहे. करारानुसार, फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इंस्टिट्यूट ऑफ इंडिया आणि सत्यजीत रे फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिप आणि प्रेझेंटेशनची संधी मिळेल. यामुळे प्रतिभावान कलाकारांच्या संघर्षाचा कालावधी कमी होईल. याव्यतिरिक्त, अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ स्कॉलरशिप देखील देणार आहे. नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या सहकार्यामुळे या विद्यार्थ्यांच्या कौशल्यात आणखी भर पडण्यास मदत होईल.

PM Narendra Modi Speech
Ghulam Nabi Azad On Rahul Gandhi: राहुल गांधींमुळं मनमोहन सिंग PM पद सोडणार होते; आझाद यांचा खळबळजनक दावा

अ‍ॅमेझॉन इंडियाच्या पब्लिक पॉलिसीचे अधिकारी चेतन कृष्णस्वामी यांनी सांगितले की, 'आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. अशा स्थितीत, माहिती प्रसारण मंत्रालयासोबतचा हा करार जगभरातील आपल्या प्रतिभेला आणि संस्कृतीला चालना देण्याची वचनबद्धता आणखी मजबूत करेल. अशामध्ये भारतातील पुरस्कार जिंकणारे चित्रपट देखील जगभरात आपल्या कलेचे नाव करेल.'

दरम्यान, माहिती प्रसारण मंत्रालय आणि अ‍ॅमेझॉनने केलेल्या करारामुळे यापुढे तुम्ही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण तुम्हाला थेट अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ, अलेक्सा आणि अ‍ॅमेझॉन म्युजिकवर ऐकता येणार आहे.

Edited By - Priya Vijay More

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com