PM Narendra Modi Statement: 'बजरंगबलीप्रमाणे भाजपही शक्तीशाली होतोय', पीएम मोदी नेमकं काय म्हणाले, वाचा!

PM Narendra Modi Speech On Hanuman Jayanti: 'बजरंगबली हे भाजपचे प्रेरणास्त्रोत आहे. बजरंगबलीप्रमाणे भाजप देखेली शक्तीशाली होतोय.', असं पीएम मोदींनी सांगितलं.
PM Narendra Modi
PM Narendra Modi Saam Tv

PM Narendra Modi Speech: भारतीय जनता पक्ष (Bharatiya Janata Party) आज आपला 44वा स्थापना दिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) देशातील भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केले. 'बजरंगबली हे भाजपचे प्रेरणास्त्रोत आहे. बजरंगबलीप्रमाणे भाजप देखेली शक्तीशाली होतोय.', असे वक्तव्य त्यांनी यावेळी केली.

PM Narendra Modi
Repo Rate Hike : सर्वसामान्यांना मोठा दिलासा! RBI कडून पतधोरण जाहीर, तुमच्या EMI वर काही परिणाम होईल का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भाजपच्या स्थापना दिनानिमित्त (BJP Party Foundation Day) देशभरातील 10 लाख 72 हजार 945 ठिकाणी उपस्थित असलेल्या भाजप कार्यकर्त्यांशी वर्च्युअलपद्धतीने संवाद साधला. यावेळी त्यांनी देशभरातील जनेतेला भगवान हनुमान जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी ते म्हणाले की, 'आज आपण देशाच्या कानाकोपऱ्यात भगवान हनुमानाची जयंती साजरी करत आहोत. आजही हनुमानजींचे जीवन भारताच्या विकासाच्या प्रवासात आपल्याला प्रेरणा देत आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे प्रेरणा मिळते. त्या महान शक्तीचा आशीर्वाद आपल्या यशातही दिसून येतो.'

PM Narendra Modi
Ghulam Nabi Azad On Rahul Gandhi: राहुल गांधींमुळं मनमोहन सिंग PM पद सोडणार होते; आझाद यांचा खळबळजनक दावा

मोदींनी पुढे सांगितले की, 'जेव्हा लक्ष्मणजींवर संकट आले, तेव्हा हनुमानजींनी संपूर्ण पर्वत उचलून आणाला होता. याच प्रेरणेने भाजप देखील लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहे आणि यापुढेही करत राहील. आज भारत मोठ्या संकटाचा सामना करत आहे. समुद्रासारख्या आव्हानांवर मात करण्यास भारत पूर्वीपेक्षा अधिक सक्षम झाला आहे.' तसंच यावेळी त्यांनी अनेकांच्या कष्टाने हा देश उभा राहिला आहे. देशातील नागरिकांचा भाजपला पाठिंबा आहे आणि भाजप हाच विकासाचा पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले.

PM Narendra Modi
ITR Return Last Date : 'आयटीआर' भरताना नवीन कर प्रणाली निवडावी की जुनी? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर

'हनुमानजी स्वतःसाठी काहीही करत नाहीत सर्व इतरांसाठी करतात. त्याचप्रमाणे भाजप कार्यकर्ते देखील सर्वांसाठी काम करतात ते स्वत:साठी काहीच करत नाहीत.', असे त्यांनी सांगितलं. तसंच, 'जेव्हा हनुमानजींना राक्षसांचा सामना करावा लागला तेव्हा ते खूप कठोर झाले. त्याचप्रमाणे भारतातील कायदा आणि भ्रष्टाचाराचा प्रश्न येतो तेव्हा भाजप देखील कठोर बनते. पवनपुत्र करू शकत नाही असे एकही काम नाही आणि भाजपही त्याच प्रेरणेने जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे.', असे देखील त्यांनी पुढे नमूद केले.

Edited By - Priya Vijay More

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com