BJP MLA On Taj Mahal: ताजमहाल प्रेमाचे प्रतीक नाही, ते पाडून टाका; भाजप आमदाराची पंतप्रधान मोदींकडे अजब मागणी

Taj mahal News : ताजमहाल आणि कुतुबमिनार पाडून मंदिर बांधा, भाजप आमदाराची मागणी
Taj Mahal
Taj Mahal Assam BJP
Published On

Latest National News: एनसीईआरटीने नुकताच इयत्ता 12वीच्या इतिहासाचा अभ्यासक्रम बदलला आहे. यामध्ये मुघल साम्राज्याशी संबंधित अनेक जुने धडे वगळण्यात आले आहेत. एनसीईआरटीच्या या निर्णयानंतर केंद्रातील भाजप सरकारवर विरोधी पक्ष टीका करत आहेत.

यातच आता भाजपच्या एका आमदाराने अजब मागणी केली आहे. या आमदाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'ताजमहाल' पाडण्याचं आवाहन केलं आहे. ही अजब मागणी करणारे भाजपचे आमदार आसाममधील असून त्यांचं नाव रुपज्योती कुर्मी, असं आहे.  (Latest Marathi News)

Taj Mahal
Jagarnath Mahato Death: झारखंडचा 'वाघ' गेला! शिक्षणमंत्री जगरनाथ महतो यांचं निधन, अधिवेशनादरम्यान अचानक बिघडली होती तब्येत

रुपज्योती कुर्मी यांचं म्हणणं आहे की, जर शाहजहानचे मुमताजवर इतके प्रेम होते, तर मुमताजच्या मृत्यूनंतर त्याने आणखी तीन लग्न का केले? ताजमहाल हे प्रेमाचे प्रतीक नसून ते पाडून मंदिर बनवायला हवे, असा आग्रह भाजप आमदाराने धरला. जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेलं ताजमहाल हे हिंदू राजघराण्यांच्या संपत्तीतून निर्माण झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.

'एएनआय' या वृत्तसंस्थेशी बोलताना कुर्मी म्हणाले, "मुघल 1526 साली भारतात आले आणि नंतर ताजमहाल बांधला. शहाजहानने हिंदू राजांकडून घेतलेल्या पैशातून ताजमहाल बांधला आणि तो आमचा पैसा होता. त्याने आपल्या चौथ्या पत्नीसाठी ताजमहाल बांधला. त्याने सात लग्न केले. ज्यापैकी मुमताज ही चौथी पत्नी होती. जर त्याचे मुमताजवर इतके प्रेम होते, तर नंतर त्याने आणखी लग्न का केले."

Taj Mahal
Repo Rate Hike: सर्वसामान्यांना मोठा दिलासा! RBI कडून पतधोरण जाहीर, तुमच्या EMI वर काही परिणाम होईल का?

ताजमहाल आणि कुतुबमिनार पाडण्याचे आवाहन

कुर्मी यांनी पंतप्रधान मोदींना ताजमहाल आणि कुतुबमिनारसारखी स्मारके पाडण्याचे आवाहन केले आहे. भाजप आमदार म्हणाले, 'मी पंतप्रधानांना आवाहन करतो की ताजमहाल आणि कुतुबमिनार लवकरात लवकर पाडण्यात यावे. या दोन्ही स्मारकांच्या जागी सुंदर मंदिरे बांधली जावीत. त्या दोन्ही मंदिरांची स्थापत्य अशी असावी की इतर कोणतेही स्मारक त्याच्या जवळ नसावे. यासोबतच ताजमहाल आणि कुतुबमिनार पाडून तेथे मंदिर बांधले तर किमान दीड वर्षाचा पगार दान करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com