

दिवाळीपूर्वी मोदी मंत्रिमंडळात फेरबदल होण्याच्या चर्चेला वेग आला.
आणखी चार मंत्री राजीनामा देणार असल्याची चर्चा
उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फेरबदल होणार
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमधील राज्यमंत्री एल. मुरुगन यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. मुरुगन यांच्या राजीनाम्यामुळे मोदींच्या मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जातेय. सरकारी सूत्रांच्या हवाल्याने एका वृत्त संस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार दिवाळीपूर्वी कधीही मोदींच्या मंत्रिमंडळात फेरबदल होऊ शकतात. या फेरबदलांमुळे किमान अर्धा डझन पदे रिक्त होण्याची शक्यता आहे.
त्याचबरोबर चार मंत्री राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू झालीय. उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता प्रादेशिक आणि जातीय राजकीय समीकरणांशी जुळणाऱ्या चेहऱ्यांना पंतप्रधान मोदी आपल्या मंत्रिमंडळात फेरबदल करतील. तसेच नव्या चेहऱ्यांना स्थान देतील अशी चर्चा सुरू झालीय.
मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळचं निम्म कालावधी पूर्ण झालाय. मोदी सरकारमध्ये गेल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात कोणत्याच प्रकारचा फेरबदल झालाय. परंतु गेल्या दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडीमुळे मोदी सरकार आपल्या मंत्रिमंडळात फेरबदल करतील अशीच चर्चा सुरू झालीय. आधी पावसाळी अधिवेशनात मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी चर्चा होती. परंतु आता हा मंत्रिमंडळ विस्तार हिवाळी अधिवेशनाच्या आधी होईल असा अंदाज वर्तवला जातोय.
मंगळवारी, केंद्रीय मंत्री एल. मुरुगन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. तामिळनाडूमध्ये पक्ष संघटनेसाठी काम करण्याची इच्छा असल्याचे त्यांनी यामागील कारण सांगितले. याआधी राज्यसभेतील आपला कार्यकाळ संपल्यानंतर केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू आणि जॉर्ज कुरियन यांनीही आपल्या मंत्रीपदांचे राजीनामे दिले होते.
भाजपनं पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी आणि ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री बी. एल. वर्मा यांचा राज्यसभा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर भाजपने त्यांना पुन्हा उमेदवारी दिलेली नाही. त्यामुळे, हे दोन्ही मंत्री नजीकच्या काळात राजीनामा देऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
केंद्रीय मंत्री हर्ष मल्होत्रा यांच्यावर भाजपनं दिल्लीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवलीय. यामुळे भाजप एक व्यक्ती एक पदच्या तत्वानुसार मोदीच्या मंत्रिमंडळातून तेही बाहेर राहतील. यासह मोदी सरकारमध्ये १२ असे मंत्री आहेत, ज्यांच्याकडे अनेक मंत्रालयाचा कारभार आहे. जवळपास ४० टक्के मंत्र्यांकडे हा अतिरिक्त भार आहे. दो कॅबिनेट मंत्र्यांकडे तीन-तीन मंत्रालयातील खाते आहेत. तर सीजेपीच्या आंदोलनानंतर धर्मेंद प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.