भाजपच्या माजी खासदाराच्या ताफ्यातील कारचा अपघात; पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

Lucknow-Agra Expressway Accident: भाजपचे माजी खासदार सुब्रत पाठक यांच्या ताफ्यातील सुरक्षा वाहनाचा कन्नौज येथील एक्सप्रेसवेवर अपघात झाला. या दुर्घटनेत हेड कॉन्स्टेबल अभिषेक त्रिपाठी यांचा मृत्यू झालाय.
Former BJP MP Subrat Pathak's convoy vehicle accident on Agra Lucknow Expressway
Former BJP MP Subrat Pathak's convoy vehicle accident on Agra Lucknow Expresswaysaam tv
Published On: 
Summary
  • माजी खासदार सुब्रत पाठक यांच्या ताफ्यातील कारचा भीषण अपघात

  • अपघातात पोलीस हेड कॉन्स्टेबलचा मृत्यू

  • सुब्रत पाठक यांच्या सुरक्षा वाहनाला दुभाजकाची धडक

भाजपच्या माजी खासदाराच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात झाला असून यात एका पोलीस कर्मचारीचा मृत्यू झालाय. लखनऊ ते आगरा एक्सप्रेसवेवर हा मोठा भीषण अपघात झाला. कन्नोज लोकसभेचे माजी भाजप खासदार सुब्रत पाठक यांच्या ताफ्यातील एक कार रस्त्याच्या दुभाजकाला धडकली आणि उलटली. या अपघातात शिपाई अभिषेक त्रिपाठी यांचा मृत्यू झालाय. तर अन्य एक सुरक्षा कर्मचारी कुंवर पाल आणि वाहन चालक गंभीर जखमी झालेत.

Former BJP MP Subrat Pathak's convoy vehicle accident on Agra Lucknow Expressway
Yavatmal Bus Accident: दारव्हा-आर्णी मार्गावर भीषण अपघात! एसटी बसची दुचाकीला धडक; दोन सख्ख्या भावांसह तिघांचा मृत्यू

या भीषण अपघातात जखमी झालेले सुरक्षा कर्मचारी आणि चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल आले आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आशुतोष मोहन अग्निहोत्री आणि पोलीस अधिक्षक विनोद कुमार सह प्रशासन आणि पोलीस अधिकारी घटनास्थळावर दाखल झाले. माजी खासदार सुब्रत पाठक देखील घटनास्थळी हजर होते. याशिवाय प्रदेशचे ऊर्जा राज्यमंत्री कैलास राजपूत आणि अनेक भाजपाचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहचलेत.

अपघातात पोलीस शिपाई अभिषेक त्रिपाटी यांच्या मृत्यूने पोलीस दलात शोककळा पसरलीय. या दुर्घटनेवरून उत्तर प्रदेशचे राज्य मंत्री कैलाश राजपूत यांनी समाजवादी पक्षावर आरोप केलाय. हा अपघात दुर्दैवी असून या मार्गावर अनेक वळणे आहेत. त्यामुळे येथे अनेकदा अपघात होतात.

Former BJP MP Subrat Pathak's convoy vehicle accident on Agra Lucknow Expressway
Bus Accident News : घाटात भीषण अपघात! ५४ प्रवाशांना अंत्यविधीसाठी घेऊन जाणारी बस पलटली; ४ महिलांचा मृत्यू

समाजवादी पक्षाचं सरकार असताना त्यांना स्वत:च्या लाभासाठी एक्सप्रेस-वे चुकीच्या पद्धतीने बांधलाय. कन्नोजचे पोलीस अधिक्षक विनोद कुमार यांनी या अपघात मृ्त्यू झालेल्या पोलीस शिपाई आणि जखमी शिपाई हे दोघेही कन्नोज येथे तैनात होते. ते भाजपचे माजी खासदार सुब्रत पाठक यांच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी ड्यूटीला होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com