Yavatmal Bus Accident: दारव्हा-आर्णी मार्गावर भीषण अपघात! एसटी बसची दुचाकीला धडक; दोन सख्ख्या भावांसह तिघांचा मृत्यू

Yavatmal Bus Accident: यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा-आर्णी मार्गावरील सायखेडा नजीक एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दोन सख्ख्या भावांसह तिघांचा मृत्यू झाला असून रामगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Three killed in ST bus and motorcycle accident near Saikheda Yavatmal
Three killed in ST bus and motorcycle accident near Saikheda Yavatmalsaamtv
Published On: 
Summary
  • सायखेडा नजीक एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात

  • या दुर्घटनेत एकूण तिघांचा मृत्यू

  • यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा-आर्णी मार्गावर घडला अपघात

संजय राठोड,साम प्रतिनिधी

यवतमाळमधील दारव्हा ते आर्णी मार्गावरील सायखेडा नजीक एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झालाय. या दुर्घटनेत दोन सख्ख्या भावांसह तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात रामगाव (हरू) येथील किशोर रामराव चव्हाण (वय ३३), दीपक रामराव चव्हाण (वय २८) आणि पवन लक्ष्मण पवार (वय १५) यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे रामगावसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,अपघातातील तिघांनाही दारव्हा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केले. मृत किशोर चव्हाण आणि दीपक चव्हाण हे दोघे सख्खे भाऊ होते. या घटनेमुळे एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Three killed in ST bus and motorcycle accident near Saikheda Yavatmal
Accident: धावत्या कारने डिव्हायडरला धडक देत घेतला पेट, ४ जण जिवंत जळाले

एसटी बसचा क्रमांक एमएच ४० एन ९९८३, तर दुचाकीचा क्रमांक एमएच १४ जे ९२३८ यामध्ये भीषण अपघात झाला दुचाकी वरील तिघांचा मृत्यू झाला असून दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.दरम्यान, हा अपघात नेमका कसा झाला याची कारणे अद्यापही स्पष्ट झालेली नाहीत.अपघातासंदर्भातील अधिकृत माहिती आणि पुढील तपास दारव्हा पोलीस करीत आहे.

Three killed in ST bus and motorcycle accident near Saikheda Yavatmal
Boat accident: समुद्रात नाव उलटली, १५ मुलांसह १३९ जणांचा मृत्यू; ११६ जण बेपत्ता

दुचाकीवरील तिघे कोणत्या दिशेने जात होते. अपघातामागे चालकाचा निष्काळजीपणा किंवा अन्य काही कारण होते का, याबाबत अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाहीये. अपघाताची माहिती मिळताच दारव्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी, वाहनांची स्थिती आणि प्रत्यक्षदर्शींकडून जबाब नोंदवण्यात आला. पोलिसांच्या तपासातूनच अपघाताचे कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, दारव्हा–आर्णी मार्गावर झालेल्या या भीषण अपघाताने पुन्हा एकदा रस्ते प्रवासातील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. अपघातानंतर अपघातानंतर जमाव संतप्त झाला होता. काही काळ या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com