PM Modi: परदेशात जाणं टाळा, सोनं खरेदी करु नका; PM मोदींच्या 'त्या' व्हिडीओनंतर देशवासीय पुन्हा संभ्रमात

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक व्हिडीओ शेअर करत देशवासियांना मोठं आवाहन केले आहे. गरज असेल तरच सोनं खरेदी करा, परदेशात प्रवास करणं टाळा, परदेशात लग्न करणं टाका, असे ते म्हणाले आहेत.
PM Modi: परदेशात जाणं टाळा, सोनं खरेदी करु नका; PM मोदींच्या 'त्या' व्हिडीओनंतर देशवासीय पुन्हा संभ्रमात
PM Narendra ModiSaam Tv
Published On
  • पंतप्रधान मोदींनी देशवासियांना आज मोठं आवाहन केले

  • पीएम मोदी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला

  • परदेश प्रवास करणं टाळण्याचे आवाहन मोदींनी केले

  • गरज नसताना सोनं खरेदी न करण्याचं आवाहन पीएम मोदींनी केले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक नवीन व्हिडीओ समोर आला असून या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी देशवासियांशी संवाद साधला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी देशवासियांना पुन्हा सोनं खरेदी करु नका, परदेशात जाणं टाळा, परदेसात लग्न करणं टाळा असे आवाहन केले आहे. पीएम मोदींच्या या व्हिडीओनंतर देशवासिय विचारात पडले आहेत.

मध्य पूर्वेतील युद्ध आणि जागतिक संकटाच्या काळातही भारतीय अर्थव्यवस्था पुढे वाटचाल करत आहे आणि जगातील सर्वात जलद वाढ असलेली एक मजबूत अर्थव्यवस्था म्हणून कायम आहे. याचा ताजा पुरावा म्हणजे देशाचा पहिल्या तिमाहीतील ७.८ टक्के जीडीपी. २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा जीडीपी वाढीचा दर ७.८ टक्के होता. पंतप्रधान मोदींनी या वाढीवर आनंद व्यक्त केला. आपल्या इन्स्टाग्रामवर पीएम मोदी यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये ते म्हणाले की, 'जीडीपीमधील वाढीबद्दल मी देशवासियांचे अभिनंदन करतो. ७.८ टक्के जीडीपी वाढ पाहून माझे मन आनंदाने भरून आले आहे ही आनंदाची भावना भविष्यातही अशीच टिकून राहो अशी माझी इच्छा आहे.'

पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना आवाहन केले की, 'मेड इन इंडिया'चा मंत्र अंगीकारा. 'व्होकल फॉर लोकल'ला प्रोत्साहन द्या. परदेशात प्रवास करणे थांबवा. परदेशात लग्न करणे टाळा. गरज नसल्यास सोने खरेदी करणेही टाळा. आपण स्वदेशीवर जितका जास्त भर देऊ तितके आपण अधिक आत्मनिर्भर होऊ आणि स्वातंत्र्याच्या १०० वर्षांच्या पूर्ततेनंतर आपण तरुण पिढीकडे एक विकसित भारत सोपवून देऊ. आज आपण कठोर परिश्रम करून तरुण पिढीची स्वप्ने साकार करणार आहोत. त्यामुळे आपल्या प्रयत्नांमध्ये कोणतीही कसर सोडू नका. आमचे हेतू स्पष्ट आहेत आणि आमच्या धोरणांमुळे १४० कोटी देशवासियांची शक्ती एकजुटीने देशाला नव्या उंचीवर नेत आहे.'

PM Modi: परदेशात जाणं टाळा, सोनं खरेदी करु नका; PM मोदींच्या 'त्या' व्हिडीओनंतर देशवासीय पुन्हा संभ्रमात
PM Modi IIT Delhi: ‘जो शिकत राहील तोच जिंकेल’; IIT दिल्लीच्या विद्यार्थ्यांना PM मोदींनी दिला यशाचा खास मंत्र

पंतप्रधान मोदी यावेळी पुढे असे सांगितले की, 'आज संपूर्ण जग युद्धाच्या अंधारात बुडाले आहे. संपूर्ण जगाला संकटांनी घेरले आहे आणि जागतिक पुरवठा साखळ्या विस्कळीत झाल्या आहेत. कोरोनाच्या महामारीमुळे २०२० मध्ये जग अस्थिर झाले होते. तरीही भारत वेगाने प्रगती करत आहे. देशातील काही जण निराशेच्या गडद अंधारात बुडाले असताना खोट्या बातम्या पसरवत आणि निराशेचे वातावरण निर्माण करत असताना या सर्वांवर मात करून आणि अडथळ्यांवर विजय मिळवून देशाने ७.८ टक्के विकास दर गाठला आहे. आपण ही गती कायम ठेवून पुढे वाटचाल करत राहिले पाहिजे आणि यासाठी आत्मनिर्भर भारत बनणे खूप आवश्यक आहे.'

PM Modi: परदेशात जाणं टाळा, सोनं खरेदी करु नका; PM मोदींच्या 'त्या' व्हिडीओनंतर देशवासीय पुन्हा संभ्रमात
PM Modi Speech LIVE: 'क्वालिटी, क्वालिटी, क्वालिटी' हाच भारताचा मंत्र - मोदी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com