

पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत
नरेंद्र मोदींच्या पत्रकार परिषद न घेण्यावर राहुल गांधींची टीका
मोदी आणि अमित शाह यांच्यावर राहुल गांधींचा जोरदार हल्लाबोल
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. इतकेच नाही तर पंतप्रधान मोदींनी पत्रकार परिषद न घेण्यावरून नार्वेमधील एका महिला पत्रकारानेही प्रश्न केला होता. आता राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत, यामागील कारण सांगितलं.
लोकसभा विरोधी पक्षनेते काँग्रेस खासदार राहुल गांधींनी 'रचनात्मक अधिवेशनात बोलताना पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. मोदी सरकारवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले की, या लोकांनी देशाला आतून उद्ध्वस्त केले आहे. शिवाय, केवळ स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी त्यांनी भारताची परराष्ट्र धोरणेही रसातळाला नेली आहे. जोपर्यंत पंतप्रधान मोदी आणि अमित शाह आपल्या पदाचा राजीनामा देत नाही तोपर्यत काँग्रेस त्यांना शांत झोप लागू देणार नसल्याचं राहुल गांधी यावेळी म्हणालेत.
पंतप्रधान मोदी मन की बात आणि आता झेन -जीच्या आंदोलनानंतर इस्टावरून देशातील जनतेशी संवाद साधतात. परंतु तो त्यांचा संवाद एकतर्फी असतो, ते लोकांचे प्रश्न ऐकून घेत नाहीत. पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात मोदी यांनी एकदाही पत्रकार परिषद घेतली नाही. मोदींच्या पत्रकार परिषद न घेण्यावरून विरोधक त्यांच्यावर वारंवार टीका करतात. तर अनेक माध्यमे देखील त्यांच्यावर प्रश्न उपस्थित करतात. आता काँग्रेसच्या अधिवेशनात बोलताना राहुल गांधींना पंतप्रधान मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत. याचे कारण सांगितलंय.
अधिवेशनात बोलताना राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान मोदी आधी पत्रकार परिषद घेत नाहीत, यामागे कादाचित काही रणनीती असेल. मार्केटिंग रणनीती असावी. परंतु एके दिवशी मी त्यांच्या सोबत एका खोलीत बसलो होतो, त्यावेळी ते पाच मिनिटापेक्षा जास्तवेळ बोलू शकले नाहीत. त्यावरून मी समजलो की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाच मिनिटापेक्षा जास्तवेळ बोलता येत नाही,त्याचमुळे ते पत्रकार परिषद घेत नाहीत.
राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना रात्री झोप लागत नाही. जोपर्यंत पंतप्रधान मोदी आणि अमित शहा राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत त्यांना रात्री झोप येणार नाही. आजकाल नरेंद्र मोदींना रात्री झोप लागत नाही. याची अनेक कारणे आहेत. काही उघड आहेत, तर काही दपललेली आहेत. अमित शाह यांचा एकेकाळी 'चाणक्य' म्हणून गौरव केला जायचा आणि आणखीही अनेक गोष्टी बोलल्या जायच्या. पण अधिवेशनाच्या काळात ते अचानक गायब झाले, पळून गेले आणि सलग २० दिवस संसदेत गैरहजर होते. आता या सरकारला जाणीव झाली आहे की, हा देश आपला आवाज उठवण्यापासून स्वतःला रोखणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.