भारत टॉप 3 एआय (AI) राष्ट्रांमध्ये असावा, इंडिया एआय मिशनवर पीएम मोदींचा भर

India IT Sector Growth With Artificial Intelligence 2030: नवी दिल्लीतील एआय इंडिया इम्पॅक्ट समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एआयमुळे भारताचे आयटी क्षेत्र २०३० पर्यंत ४०० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचू शकते असे सांगितले.
Prime Minister Narendra Modi addresses the AI-India Impact Summit in New Delhi, highlighting India’s ambitious AI growth roadma
Prime Minister Narendra Modi addresses the AI-India Impact Summit in New Delhi, highlighting India’s ambitious AI growth roadmaSaam Tv
Published On

नवी दिल्ली येथे झालेल्या एआय-इंडिया इम्पॅक्ट समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या आयटी क्षेत्रात एआयच्या भूमिकेवर भर दिला. ते म्हणाले की एआय भारताच्या आयटी क्षेत्र बंद करत नसून ते पूर्णपणे बदलत आहे. एआयकडे एक सक्षमकर्ता म्हणून पाहिले पाहिजे. जे नवीन युगातील आउटसोर्सिंग आणि डोमेन-स्पेसिफिक ऑटोमेशनद्वारे विकासाला चालना देईल. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदी म्हणाले, एआयमध्ये होत असलेल्या बदलामुळे भारताचे आयटी क्षेत्र २०३० पर्यंत ४०० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचू शकते. या क्षेत्राकडे सेवा निर्यातीसाठी आधीच एक मजबूत आधार बनत आहे. आता, एआयसह, ते उत्पादने, प्लॅटफॉर्म आणि उपाय तयार करण्यात देखील पुढे जाऊ शकते.

Prime Minister Narendra Modi addresses the AI-India Impact Summit in New Delhi, highlighting India’s ambitious AI growth roadma
संसदेत मोठा राडा, कायदे मंत्री शपथ घेताना खासदारांची हाणामारी; तुर्कस्तानमध्ये घडला प्रकार, VIDEO

पीएम मोदी म्हणाले, भारत जगातील तीन प्रमुख एआयमध्ये असावा. सरकारने इंडिया एआय मिशनद्वारे एक मजबूत देशांतर्गत एआय इकोसिस्टम विकसित करण्यासाठी एक व्यापक धोरण स्वीकारले आहे. या मिशन अंतर्गत जीपीयूची संख्या आधीच लक्ष्य ओलांडली आहे आणि आणखी २०,००० जीपीयू (GPU) जोडले जात आहेत. ज्यामुळे एकूण संख्या ३८,००० पेक्षा जास्त झाली आहे. उच्च दर्जाचे जीपीयू (GPU) आता फक्त ६५ रुपये प्रति तास दराने उपलब्ध आहेत, जे जागतिक सरासरीपेक्षा सुमारे एक तृतीयांश कमी आहे. आरोग्य, कृषी, शिक्षण आणि शहरांमध्ये चार उत्कृष्टता केंद्रे आणि पाच राष्ट्रीय कौशल्य केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.

Prime Minister Narendra Modi addresses the AI-India Impact Summit in New Delhi, highlighting India’s ambitious AI growth roadma
Bangladesh Politics: संविधान बदलण्यास नव्या PM चा नकार; तारिक रहमान यांनी युनूस यांचा प्रस्ताव फेटाळला

पंतप्रधानांनी सांगितले की, पुढील काळात भारत एआय क्षेत्रात स्वतःच्या गरजांनुसार उपाय तयार करण्यावर भर देणार आहे. म्हणजेच फक्त परदेशी तंत्रज्ञान वापरण्याऐवजी भारतातच एआयचे डिझाइन, संशोधन आणि विकास केला जाईल. एआय क्षेत्रात २०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या आणि संधी निर्माण होऊ शकतात. पंतप्रधानांनी एआयमधील पक्षपात या समस्येबद्दलही चिंता व्यक्त केली. एआय प्रणाली काही वेळा लिंग, भाषा किंवा आर्थिक परिस्थिती यावर आधारित भेदभाव करू शकतात.

Prime Minister Narendra Modi addresses the AI-India Impact Summit in New Delhi, highlighting India’s ambitious AI growth roadma
ऐतिहासिक निर्णय, नॉनव्हेज खाण्यावर बंदी; हॉटेल-दुकानातही चिकन, मटण मिळणार नाही, कोणत्या शहरात मनाई?

उदाहरणार्थ, जर एआय मॉडेल फक्त इंग्रजी किंवा शहरातील लोकांच्या माहितीवर तयार केले असेल, तर ते ग्रामीण भागातील लोकांसाठी किंवा प्रादेशिक भाषा बोलणाऱ्यांसाठी नीट काम करणार नाही. भारतामध्ये अनेक भाषा, संस्कृती आणि परंपरा आहेत. त्यामुळे एआय तयार करताना भारताची ही विविधता लक्षात घेणे खूप गरजेचे आहे. यासाठी भारत जागतिक सहकार्यालाही महत्त्व देणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com