संसदेत मोठा राडा, कायदे मंत्री शपथ घेताना खासदारांची हाणामारी; तुर्कस्तानमध्ये घडला प्रकार, VIDEO

turkey mp fight viral : तुर्कस्तानच्या संसदेत मोठा राडा झाल्याची घटना घडली. कायदे मंत्री शपथ घेताना खासदारांची हाणामारी झाल्याची घटना घडली.
turkey mp fight
turkey mp fight viral Saam tv
Published On
Summary

तुर्कस्तानच्या संसदेत मोठा गोंधळ

कायदे मंत्री गुरलेक यांच्या शपथविधीवेळी खासदारांची हाणामारी

विरोधी आणि सत्ताधारी पक्षातील खासदारांमध्ये हाणामारी

तुर्कस्तानच्या संसदेत मोठा राडा झाला. संसदेत खासदारांची हाणामारी झाल्याची घटना घडली. राष्ट्राध्यक्ष रेसेप यांनी घेतलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या निर्णयावरून खासदारांच्या दोन गटात हाणामारी झाली. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील खासदारांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

तुर्कस्तान सरकारने कायदे मंत्रीपदी अकिन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर तुर्कस्तान सरकारच्या निर्णयाचा विरोधी पक्षातील खासदारांनी विरोध केला. विरोधी पक्षातील खासदारांनी आक्रमक भूमिका घेत थेट सत्ताधारी खासदारांना मारहाण करण्यास सुरुवात केली. दोन्ही गटातील खासदारांनी एकमेकांना लाथबुक्यांनी मारहाण केली.

मीडिया रिपोर्टनुसार, अकिन गुरलेक शपथ घेण्यासाठी संसदेत पोहोचले. त्यावेळी विरोधी पक्षातील खासदारांनी रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी गुरलेक यांना चारी बाजूंनी संरक्षण दिलं. या संरक्षणामध्ये गुरलेक यांचा मंत्रिपदाचा शपथविधी झाला.

turkey mp fight
वर्ल्ड कपमधील मिस्ट्री गर्ल कोण? फोटो पाहून लाखो फॉलोअर्स पडले प्रेमात? VIDEO

सरकारने मंत्रिमंडळ विस्ताराचा कोणतही कारण सांगितलेलं नाही. मीडिया रिपोर्टनुसार, तुर्कस्तान सरकारने काही मंत्र्यांना पद सोडण्यास सांगितलं होतं. तुर्कस्तानमध्ये सरकार आणि विरोधी पक्षात आधीपासूनच तणाव पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षांच्या ताब्यात असलेल्या नगरपालिकांमधील शेकडो अधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

turkey mp fight
मुंबईत अपघाताचा थरार, १७ वर्षांच्या मुलाने कारने जोडप्याला उडवलं, नवऱ्याची ११ दिवसांची मृत्यूशी झुंज अपयशी

अकिन हे इस्तांबुलचे मुख्य सरकारी अभियोक्ता होते. त्यांनी प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या रिपब्लिकन पीपल्स पार्टीच्या अनेक मोठ्या नेत्यांविरोधातील खटल्यांची सुनावणी केली होती. या विरोधात विरोधी पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. गुरलक यांनी दिलेले निर्णय राजकीय प्रेरणेतून घेतले गेल्याचा विरोधकांचा आरोप आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com