

मुंबईत १७ वर्षीय मुलाच्या कारचा अपघात.
मुलाच्या कारने दुचाकीवरील नवरा-बायकोला धडक
दुचाकीवरील नवऱ्याचं १० दिवसांनंतर उपचारादरम्यान निधन
मयूर राणे, साम टीव्ही
मुंबईच्या विद्याविहारमध्ये अपघाताची धक्कादायक घटना घडली. १७ वर्षीय मुलाच्या कारने दुचाकीवरील नवरा-बायकोला उडवलं. या अपघातात ध्रुमिल पटेल हे गंभीर जखमी झाले होते. गेल्या १० दिवसांपासून रुग्णालयात सुरू असलेली त्यांची झुंज अपयशी ठरली. ध्रुमिल पटेल यांचं रविवारी निधन झालं.
अपघातग्रस्त पटेल जोडपे घाटकोपरचं होतं. त्यांच्या दुचाकीचा ५ फेब्रुवारी रोजी तानसा पाइपलाइन रोडच्या सोमैया कॉलेजजवळ अपघात झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, ध्रुमिल आणि त्यांची पत्नी मिनल हे दुचाकीने घरी चालले होते. त्याचवेळी समोर आलेल्या भरधाव कारने दोघांना उडवलं.
विद्याविहारमध्ये झालेल्या भीषण अपघातात ३२ वर्षीय मीनल पटेल यांची देखील प्रकृती गंभीर आहे. त्यांच्या हात आणि पायाला गंभीर जखमा आहेत. त्यांच्यावर मागील १० दिवसांत अनेक शस्त्रक्रिया झाल्या आहेत. त्यांच्यावर घाटकोपरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की, 'भरधाव कारने धडक दिल्यानंतर दुचाकीवरील जोडपे दूरवर जाऊन पडले. या अपघातानंतर त्यांना तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल केले. पुढे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
टिळकनगर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 'दोषींवर कठोर कारवाई केली जाईल'. कार अल्पवयीन मुलगा चालवत होता, अपघातानंतर नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न समोर आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. ध्रुमिल यांच्या मृत्यूनंतर नागरिकांनी दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे.
कार मालकाचं नाव वालजी राजा भूषण असून त्यांचा १७ वर्षीय मुलगा ही कार चालवत होता. अपघातानंतर ध्रुमिल आणि मीनल पटेल यांना जबर मार लागला होता. ध्रुमिल यांचा काल मृत्यू झाला असून मीनल या मृत्यूशी झुंज देत आहे. ध्रुमिल यांच्या डोक्याला मार लागला होता. तसेच त्यांच्या बरगड्या आणि हाताला फ्रॅक्चर झालं होतं. तर मीनल यांच्या डोक्याला इजा झाली असून हात फ्रॅक्चर झाला आहे. संबंधित प्रकरणाचा टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.