फक्त 32 रुपयांत पेट्रोल-डिझेल! गुजरातमध्ये भन्नाट शोध, 60 अ‍ॅव्हरेजचा दावा

Cost Of Plastic Fuel Per Litre In Gujarat: प्लास्टिक कचऱ्यापासून तयार होणारे स्वस्त पेट्रोल-डिझेल आता भारतात! गुजरातमधील संशोधनामुळे केवळ ३२ रुपये प्रति लिटर दरात इंधन आणि ६० किमीपर्यंत मायलेजचा दावा.
Motorcycles tested successfully on plastic-derived fuel developed by Gujarat scientists, delivering up to 60 km mileage.
Motorcycles tested successfully on plastic-derived fuel developed by Gujarat scientists, delivering up to 60 km mileage.saam tv
Published On

पेट्रोलियम पदार्थांच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडणारा बोजा कमी करण्यासाठी नवनवीन पर्याय शोधले जात आहेत. इथेनोल मिश्रित पेट्रोलनंतर आता देशात एका नवीन प्रकारच्या पेट्रोल डिझेलची निर्मिती करण्यात आली आहे. हे इंधन केवळ अत्यंत स्वस्तच नाही, तर यातून मिळणारे मायलेजही सामान्य इंधनाइतकेच आहे. प्लास्टिक कचऱ्यापासून तयार केलेल्या या पेट्रोल डिझेलमुळे एकीकडे इंधनाचा एक नवीन आणि स्वस्त पर्याय मिळणार आहे, तर दुसरीकडे प्लास्टिक कचऱ्याच्या समस्येपासूनही मुक्ती मिळणार आहे.

Motorcycles tested successfully on plastic-derived fuel developed by Gujarat scientists, delivering up to 60 km mileage.
Sanjay Raut On Modi | इंदापुरातील मेळाव्यातून राऊतांचा भाजप- मोदींवर हल्लाबोल! | Marathi News

टाइम्स ऑफ इंडियाच्या एका वृत्तानुसार, वडोदरा येथील गती शक्ती विद्यापीठाच्या शस्त्रज्ञानी ही किमया करून दाखवली आहे. त्यांनी मिश्र प्लास्टिक कचऱ्याचे यशस्वीरित्या पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनात रूपांतर केले आहे. विशेष म्हणजे हा फॉर्म्युला केवळ कागदावर किंवा लॅबपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर या इंधनावर मोटारसायकल चालवून त्याची यशस्वी चाचणीही घेण्यात आली आहे. हे. भारतातील एका आघाडीच्या दुचाकी निर्माता कंपनीच्या तीन मोटारसायकल या 'पेस्ट्रो पेट्रोल'वर चालवून पाहण्यात आल्या. यासाठी गाड्यांच्या इंजिनमध्ये कोणताही बदल करावा लागला नाही.

Motorcycles tested successfully on plastic-derived fuel developed by Gujarat scientists, delivering up to 60 km mileage.
देशावर घोंघावतंय सर्वात मोठं संकट! 'गॉडझिला'मुळे धडकी भरली, पुढील ३ महिने अत्यंत महत्त्वाचे; नेमका काय दिला इशारा?

प्लास्टिक पेट्रोलवर बाईकने दिला ६० चा एव्हरेज

या इंधनाची आणखी एक सकारात्मक बाजू म्हणजे याचे मायलेजही सामान्य पेट्रोलइतकेच आहे. १०० सीसीच्या ज्या बाईकने सामान्य पेट्रोलवर ६२ चा एव्हरेज दिला होता, तीच बाईक प्लास्टिकपासून तयार केलेल्या एक लीटर पेट्रोलवर ६० किलोमीटर धावली. या नवीन पेट्रोलचे फायदे वाचून तुम्हाला आनंद झाला असेलच, पण आणखी एक आनंदाची बातमी आहे. या पेट्रोलमुळे होणारे प्रदूषणही ठरवून दिलेल्या मानकांच्या आतच आहे. प्लास्टिक पेट्रोलवर चालणाऱ्या या मोटारसायकलींनी 'पलूशन अंडर कंट्रोल' (PUC) प्रमाणपत्रही मिळवले आहे.

Motorcycles tested successfully on plastic-derived fuel developed by Gujarat scientists, delivering up to 60 km mileage.
Famous Actor : "फसवणूक करून पत्नीच्या अकाउंटमधून दोनदा पैसे गेले..."; प्रसिद्ध अभिनेता सायबर क्राइमचा शिकार, सांगितला 'तो' धक्कादायक प्रसंग

१०० किलो प्लास्टिकमधून मिळणार ५० किलो इंधन; किंमत ३२ रुपये

संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या मते, १०० किलोग्राम प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करून सुमारे ५० किलोग्राम इंधन तयार केले जाऊ शकते. या प्रक्रियेत कच्चे तेल २४ रुपये प्रतिलीटर दराने उत्पादित केले जाऊ शकते, तर त्याला रिफाईन (अपग्रेड) केल्यानंतर त्याची अंतिम किंमत ३२ रुपये प्रतिलीटर असेल. शास्त्रज्ञांनी सांगितले की, या तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेले तेल ९० टक्क्यांपर्यंत सामान्य पेट्रोल-डिझेलसारखेच आहे.

'या' दुर्गम भागांत होऊ शकते सुरुवात

प्लास्टिकपासून पेट्रोल बनवण्याचे प्रकल्प सुरुवातीला अशा ठिकाणी सुरू केले जाऊ शकतात, जिथे प्लास्टिक कचरा ही एक मोठी समस्या आहे आणि तिथे इंधन पोहोचवणे देखील कठीण आहे. लेह, लडाख, केदारनाथ आणि बद्रीनाथ यांसारख्या दुर्गम ठिकाणी असे युनिट्स (प्रकल्प) उभारण्याचा विचार सुरू आहे. याशिवाय झाशी येथील रेल्वे लोकोमोटिव्ह शेड आणि कोलकाता येथील लष्करी छावणीतही (कॅन्टोन्मेंट) असे प्रकल्प सुरू केले जाऊ शकतात. या योजनेबाबत सध्या विविध मंत्रालयांमध्ये चर्चा सुरू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com