पराग ढोबळे
नागपूर : महामार्गावरून जात असलेल्या कंटेनर चालकाने कोणत्याही प्रकरणी सिग्नल किंवा हात न दाखवता अचानक यु टर्न घेतला. याच वेळी मागून आलेली दुचाकी कंटेनरला धडकली. यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीस्वार चाकाखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. कंटेनर चालकाच्या चुकीमुळे एकाला जीव गमवावा लागला आहे.
नागपुर- अमरावती राष्ट्रीय महामार्गावर हिंगणा पोलीस स्टेशन अंतर्गत धामणा शिवारात सदरची घटना घडली आहे. या अपघातात रामेश्वर गावंडे (वय ३०) असे मृत झालेल्या इसमाचे नाव आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास वेदांता धाब्याजवळ कंटेनर नागपूरच्या दिशेने जाण्यासाठी वळण घेत असताना सदरचा अपघात घडला. या अपघातामुळे परिसरात धावपळ सुरु झाली होती.
कंटेनर चालकाच्या चुकीने गेला जीव
दरम्यान कंटेंनरने यूटर्न घेताना चालकाने इंडिकेटर दिला नाही किंवा हात देखील दाखविला नाही. यामुळे मागून येणाऱ्या दुचाकीस्वाराला काही समजले नाही. यात पुढे जाण्याचा प्रयत्नात मोटारसायकलची धडक होऊन दुचाकीस्वार कंटेनरच्या चालक साईडकडील पुढील चाकात आल्यानं दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.
बसच्या चाकाखाली चिरडून एकाचा मृत्यू
जालना : जालन्यात बसच्या चाकाखाली चिरडून एका ४८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. बदनापूर नगरपंचायत कार्यालयासमोर हा अपघात घडला. संजय सुदामराव चंदनपाट (वय ४८) असं मयताचे नाव आहे. संजय चंदनपाट हे दुचाकीवरून जालना - छत्रपती संभाजीनगर महामार्गावरून जात होते. यावेळी बसने त्यांना ओवरटेक केले. यावेळी बसच्या मागच्या चाकाखाली दुचाकी आली. यावेळी बसच्या चाकाखाली चिरडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.