Solapur Rain : दक्षिण सोलापुरात पावसाचा हाहाकार; अनेक गावांना फटका, शेतात पाणीच पाणी

Solapur News : राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस सुरु असल्याने पिके पाण्याखाली गेले आहेत. तर दुसरीकडे अनेक भागात पावसाने दडी मारली असल्याने बळीराजाला पावसाची प्रतीक्षा लागून आहे
Solapur Rain
Solapur RainSaam tv
Published On

सोलापूर : मागील तीन- चार दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे. मुसळधार पडणाऱ्या पावसाने हाहाकार माजविला आहे. यात दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक गावांना जोरदार पावसाचा फटका बसला आहे. जोरदार पाऊस पडत असल्याने अनेक भागात पाणी साचले असून शेतांना देखील तलावाचे स्वरूप प्राप्त झाले असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

राज्यातील काही भागात पावसाने दडी मारली असून शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागून आहे. पावसाअभावी पिके करपू लागल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून उत्पन्नात देखील घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे सोलापूर, बुलढाणा जिल्ह्यात तीन- चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळे सगळीकडे पाणीच पाणी साचल्याने पाहण्यास मिळत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक खरीपांच्या पिकांना नैसर्गिक संकट निर्माण झाले आहे. 

Solapur Rain
Dengue : गडचिरोलीत डेंग्यूचा कहर; महिलेसह दोन जणांचा मृत्यू, मुलचेरा तालुक्यात ६६ रुग्ण

पावसामुळे शेती पिकांचे नुकसान 

दरम्यान दक्षिण सोलापूर भागातील बक्षी हिप्परगा गावाला रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी साचले आहे. बक्षी हिप्परगा गावातून जाणाऱ्या ओढ्याची पाणी पातळी वाढली असून ओढ्याच्या पाण्यातून वाट काढण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. तर बोरामणी येथून ओढ्याला आलेल्या पाण्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झाले आहे. यामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक शेती पिकांना फटका बसल्यामुळे नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. 

Solapur Rain
Satara : गाडीतून अनधिकृत किटकनाशक विक्री; कृषी विभागाची कारवाई, कंपनीवर गुन्हा दाखल

चिखली तालुक्यात अतिवृष्टी

बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यात खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच हुमणी अळीचा मोठा प्रादुर्भाव झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर ९ ऑगस्टला झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे नुकसानात अधिक भर पडली असून या दोन्ही आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने सादर केला आहे. त्यानुसार तालुक्यातील तब्बल ५ हजार ७५७ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाल्याचे समोर आले आहे. आता शेतकऱ्यांना तत्काळ मदतीची अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com