Famous Actor : "फसवणूक करून पत्नीच्या अकाउंटमधून दोनदा पैसे गेले..."; प्रसिद्ध अभिनेता सायबर क्राइमचा शिकार, सांगितला 'तो' धक्कादायक प्रसंग

Vikrant Massey Family Targeted By Cybercrime : बॉलिवूड अभिनेत्यासोबत सायबर क्राइमची घटना घडली. एका कार्यक्रमादरम्यान अभिनेत्याने याचा खुलासा केला. अभिनेत्याच्या पत्नीच्या खात्यातून दोनदा पैसे कापले गेले.
Vikrant Massey  Family Targeted By Cybercrime
Famous ActorSAAM TV
Published On
Summary

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सायबर क्राइमचा शिकार

सोशल मीडिया अकाउंट हॅक केले गेले

पत्नीच्या खात्यातून दोनदा पैसे कापले गेले

बॉलिवूड अभिनेता विक्रांत मॅसी सध्या त्याचा आगामी वेब सीरिज 'प्रीतम अँड पेड्रो' मुळे चांगलाच चर्चेत आहे. अलिकडेच सीरिजचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. चाहते या वेब सीरिजसाठी खूपच उत्सुक आहेत. ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमात विक्रांत मॅसीने खुलासा केला की, त्याला आणि त्याच्या कुटुंबाला सायबर क्राइमचा सामना करावा लागला आहे. अभिनेत्याने सांगितले की हॅकर्सनी त्याच्या सोशल मीडिया अकाउंट हॅक केले, तसेच पत्नीच्या अकाउंट दोनदा फसवणूक करून पैसे काढले गेले.

'बॉलिवूड हंगामा'ने दिलेल्या वृत्तानुसार, विक्रांत मॅसी सायबर क्राइम बद्दल म्हणाला की, "माझ्यासोबत असे ३-४ वेळा घडले आहे. माझे इन्स्टाग्राम हँडल दोनदा हॅक झाले होते. माझे फेसबुक खाते एकदा हॅक झाले होते. माझ्या पत्नीच्या खात्यातूनही दोनदा फसवणूक करून पैसे काढले गेले आहेत..." अलिकडेच घडलेला प्रसंग सांगताना विक्रांत मॅसी म्हणाला, "अलिकडेच माझ्या वहिनीच्या वडिलांची फसवणूक झाली. त्यानंतर आम्ही सायबर सुरक्षा तज्ज्ञ अमित दुबे यांच्याशी संपर्क साधला. ते या क्षेत्रात किती निष्णात आहेत, हे आपण सर्वांनी पाहिलेच आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला मदत केली..."

'प्रीतम अँड पेड्रो' चा ट्रेलर लाँच कार्यक्रम मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडला.'प्रीतम अँड पेड्रो' ही वेब सीरिज सायबर गुन्हे आणि त्याचा लोकांवर होणारा परिणाम या विषयांवर भाष्य करते.'प्रीतम आणि पेड्रो' 3 जुलैपासून जिओ हॉटस्टार पाहायला मिळणार आहे. या वेब सीरिजमध्ये पेड्रोच्या भूमिकेत अर्शद वारसी, प्रीतमच्या भूमिकेत वीर हिरानी आणि विक्रांत मॅसी प्रतिस्पर्ध्याच्या भूमिकेत (मार्टिन) झळकले आहेत.

विक्रांत मॅसी 'प्रीतम अँड पेड्रो' या वेब सीरिजबद्दल म्हणाला की, "ही सीरिज सायबर गुन्ह्यांवर आधारित आहे. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आपणही याचे टार्गेट बनलो आहोत. या शोमध्ये मनोरंजनासोबतच सायबर गुन्ह्यांशी संबंधित मानवी पैलूंचाही समावेश आहे..." ट्रेलर लाँच कार्यक्रमाला राजकुमार हिरानी, ​​वारसी, वीर हिरानी, ​​मोना सिंग, शंतनू मोईत्रा, स्वानंद किरकिरे, दिग्दर्शक अविनाश अरुण आणि आलोक जैन यांनी हजेरी लावली.

Vikrant Massey  Family Targeted By Cybercrime
Marathi Serial : सूडाची प्रेम कहाणी घेऊन 'ती' आली...; नव्या मराठी मालिकेची सोशल मीडियावर तुफान चर्चा, VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com