Amitabh Bachchan: 'सरकार को बोलो भाई...' सायबर क्राइम कॉलर ट्यून ट्रोलरला अमिताभ बच्चन यांनी दिलं सडेतोड उत्तर

Amitabh Bachchan On troller: सध्या फोन कॉल्सवर सायबर गुन्ह्यांच्या जागरूकतेचा आवाज असलेले अमिताभ बच्चन यांना सोशल मीडियावर ट्रोलचा सामना करावा लागला पण त्यांनी त्यांच्या खास स्टाईलमध्ये त्यांना उत्तर दिलं आहे.
Amitabh Bachchan
Amitabh BachchanAaam Tv
Published On

Amitabh Bachchan: आपण जेव्हा जेव्हा कोणाला फोन करण्यासाठी फोन उचलतो तेव्हा आपल्याला प्रथम अमिताभ बच्चनचा आवाज ऐकू येतो कारण ते लोकांना सायबर गुन्ह्यांबद्दल जागरूक करतात आणि सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देतात. अलिकडेच, सोशल मीडियावर बच्चन यांना या कॉलर ट्यूनमुळे ट्रोल करण्यात आले होते. त्यावर बच्चन यांनी सडेतोड उत्तर देत ट्रोलरला गप्प केल आहे.

एका ट्विटर वापरकर्त्याने त्यांना टॅग करत लिहीले होते, " फोन पे बोलना बंद करो भाई" बच्चन साहेबांनी यावर, "सरकार को बोलो भई, उन्होंने हमसे कहा" असं उत्तम उत्तर दिलं आहे. तसेच आणखी एका नेटकऱ्याने लिहीले,दरम्यान, दुसऱ्या एका ट्रोलरने त्यांना लिहिले, सॉलिड गांजा फूटते हो सर या नेटकऱ्याला देखील बिग बींनी उत्तर दिले, "एक गांजा फूंके हुए ही ऐसे लिख सकता है जैसे आपने लिखा है"

Amitabh Bachchan
Actor Arrested: 'या' प्रसिद्ध अभिनेत्याला सुनावली न्यायालयीन कोठडी; कोकेन खरेदी केल्याचा गंभीर आरोप

काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी अभिषेक बच्चनच्या आगामी चित्रपट 'कालिधर लापता' या चित्रपटाच्या ट्रेलरचे भरभरून कौतुक केले होते. त्यांनी लिहिले, अभिषेक, माझ्या प्रार्थना.. वेगवेगळ्या भूमिका आणि चित्रपट निवडण्याची आणि त्यात स्वतःला झोकून देण्याची तुझी क्षमता.. आणि यशस्वी हो.. हा एक दुर्मिळ गुण आहे.. प्रेम आणि आशीर्वाद.

Amitabh Bachchan
Ramayan Movie: रणबीर कपूरच्या रामायणात काम करण्याची 'या' अभिनेत्याला आली ऑफर; पण, नकार देत म्हणाला, 'माझ्यासाठी...'

कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, अमिताभ बच्चन यांचा शेवटचा चित्रपट 'कलकी २८९८ एडी' होता ज्यासाठी त्यांना प्रचंड प्रेम मिळाले. दरम्यान, अभिषेक 'हाऊसफुल ५' च्या यशानंतर ४ जुलै रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'कालीधर लापता' या चित्रपटात दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com