Famous Actor Arrested: तमिळ आणि तेलुगू चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारा सुप्रसिद्ध अभिनेता श्रीकांत चुकीच्या कारणांमुळे प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. ड्रग्ज प्रकरणात त्याचे नाव समोर आले आहे ज्यामुळे अभिनेत्याला ७ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत सुनावण्यात आली आहे.
अलीकडच्या काळात दक्षिण चित्रपटसृष्टीत ड्रग्जची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. मल्याळम चित्रपटसृष्टीशी संबंधित अनेक दिग्गज कलाकारांना ड्रग्ज प्रकरणात चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे आणि आता तमिळ-तेलगू अभिनेता श्रीकांत देखील या प्रकरणात अडकला आहे.
श्रीकांत १५ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत
२३ जून २०२५ रोजी, श्रीकांतला चेन्नई पोलिसांनी ड्रग्जशी संबंधित प्रकरणात चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याला चौकशीसाठी नुंगमबक्कम पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे आणि त्याच्या रक्ताचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तपासात पोलिसांना काही महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत ज्यानंतर अभिनेत्याला अटक करण्यात आली आणि ७ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.
कोकेन वापरल्याचा आरोप
वृत्तानुसार, श्रीकांतवर ड्रग्ज खरेदी करण्याचा आणि कोकेन वापरल्याचा आरोप आहे. तो अनेक ड्रग्ज पुरवठादारांच्या संपर्कात असल्याचेही म्हटले जात आहे. एवढेच नाही तर या प्रकरणाचे धागेदोरे अण्णा द्रमुकचे माजी सदस्य टी प्रसाद यांच्याशीही जोडले जात आहेत, ज्यांना नुकतेच ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. असे बोलण्यात येते की श्रीकांतने टी प्रसाद यांच्याकडून ड्रग्ज खरेदी केले होते.
श्रीकांत २६ वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे
श्रीकांत गेल्या अडीच दशकांपासून चित्रपटसृष्टीत काम करत आहे. त्याने १९९९ मध्ये 'जन्नल - मारबू कविताईगल' या टीव्ही शोमधून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. तो पहिल्यांदा रोजा कूटम या तमिळ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर दिसला. त्याने अनेक तमिळ आणि तेलगू चित्रपटांमध्ये काम केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.