Pitru paksha : पितृपक्षात दुर्दैवी घटना! श्राद्धासाठी नदीवर गेलेल्या एकाच कुटुंबातील ५ जणांचा बुडून मृत्यू

pitru paksha tragedy: five family members drown in jhansi : पितृपक्षात रानीपूरच्या देवी सिंह पुरा गावात दुर्दैवी घटना घडली. श्राद्ध विधीसाठी सुखनई नदीवर गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेने अख्ख्या गावावर शोककळा पसरली.
 pitru paksha tragedy: five family members drown in jhansi
उत्तर प्रदेशातील झांसीच्या रानीपूर परिसरात श्राद्ध विधीसाठी सुखनई नदीवर गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती आहे.social media
Published On: 

Jhansi Sukhnai river drowning incident latest news : उत्तर प्रदेशातील झांसी जिल्ह्यातील रानीपूर येथील देवी सिंह पुरा गावात अत्यंत दुर्दैवी घटना घडली. पितृपक्षात श्राद्धाच्या विधीसाठी सुखनई नदीवर गेलेल्या पाच जणांचा बुडून मृत्यू झाला. मृत्यू झालेले सर्व जण एकाच कुटुंबातील होते. एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात हे पाचही जण बुडाले. या घटनेनंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि स्थानिक तात्काळ नदीवर पोहोचले. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी सर्व जणांना बाहेर काढले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. हे सर्व जण श्राद्ध विधीसाठी सुखनई नदीवर गेले होते. त्यापैकी अभिनय नावाचा मुलगा नदीच्या पाण्यात बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी इतर चौघे पाण्यात उतरले. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते चौघेही बुडाले. यात अर्पित (वय १२), अनुप तिवारी (४५), अभिनय तिवारी (२६), श्रेयांश तिवारी (२१), पुष्कर शुक्ला (२३) यांचा समावेश आहे.

नदीत बुडून मृत्यू झालेले सर्व तरुण आणि मुले एकाच कुटुंबातील आहेत. या दुर्दैवी घटनेने कुटुंबासह नातेवाईक आणि गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. पोलिसांनी या घटनेची नोंद करून तपास सुरू केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सर्वांचे मृतदेह ताब्यात घेऊन विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासन स्थानिक प्रशासनाने दिले आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 pitru paksha tragedy: five family members drown in jhansi
Cylinder Blast : जेवण बनवताना गॅस सिलिंडरचा स्फोट, ३ घरं कोसळली, लहान मुलासह चौघांचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com