Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल अन् CNG च्या दरात वाढ, तुमच्या शहरातील आजचे दर किती?

PETROL DIESEL CNG PRICE TODAY:
Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल अन् CNG च्या दरात वाढ, तुमच्या शहरातील आजचे दर किती?
PETROL DIESEL CNG PRICE TODAY: Saam Tv
Published On: 
  • २१ ऑक्टोबर २०२६ रोजी अनेक शहरांमध्ये इंधन दरात मोठा बदल

  • नोएडामध्ये पेट्रोल १६ पैसे आणि डिझेल १२ पैशांनी महागले

  • चेन्नई, मथुरा आणि मेरठमध्ये सीएनजी प्रति किलो २ रुपयांनी वाढले

  • मुंबई आणि बंगळुरूमध्ये सीएनजी दरात प्रत्येकी १ रुपयाची वाढ

पेट्रोल-डिझेल आणि सीएनजीच्या दरात मोठा बदल झाला आहे. आज अनेक शहरातील दरात वाढ झाली आहे. नोएडामध्ये आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ नोंदवली गेली. दुसरीकडे, सीएनजी वापरकर्त्यांनाही धक्का बसला कारण सीएनजीचे दर वाढले. देशातील ९ शहरांमध्ये सीएनजीचा दर ५० पैशांवरून २ रुपये प्रति किलोपर्यंत वाढला आहे. चेन्नई, मथुरा आणि मेरठमध्ये सीएनजीच्या दरात २ रुपयांची वाढ झाली आहे. देशातील अनेक शहरात आज पेट्रोल-डिझेल आणि सीएनजीच्या दरात मोठा बदल झाला. देशातील दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, नोएडा, लखनऊ आणि हैदराबाद या शहरात आजचे दर किती आहेत ते आपण जाणून घेणार आहोत...

नोएडामध्ये २१ ऑक्टोबर रोजी पेट्रोल आणि डिझेल या दोन्हींच्या दरात वाढ झाली. पेट्रोल १६ पैशांनी महाग होऊन प्रति लिटर १०२.१२ रुपयांवर पोहोचले आहे. तर डिझेलच्या दरात १२ पैशांनी वाढ होऊन ते प्रति लिटर ९५.५६ रुपयांवर पोहोचले. नोएडा आणि दिल्लीमध्ये पेट्रोलच्या दरात बदल नाही झाला हा दर सारखाच आहे. या दोन्ही ठिकाणी पेट्रोल प्रति लिटर १०२.१२ रुपये आहे. नोएडामध्ये डिझेल दिल्लीपेक्षा ३६ पैशांनी महाग आहे. गुरुग्राममध्ये पेट्रोलचा दर १०२.९७ रुपये आणि डिझेलचा दर ९५.६४ रुपये प्रति लिटरवर स्थिर राहिला.

हैदराबादमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर ११६.१५ रुपये इतका सर्वाधिक नोंदवला गेला. तिरुवनंतपुरममध्येही पेट्रोलचा दर प्रति लिटर ११५.४९ रुपये झाला. दोन्ही शहरांमध्ये डिझेलचे दरही प्रति लिटर १०० रुपयांपेक्षा जास्त होते. चंदीगडमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर १०१.५४ रुपये आणि डिझेलचा दर प्रति लिटर ८९.४७ रुपये नोंदवला गेला.या शहरातील डिझेलचे दर इतर शहरांच्या तुलनेत कमी आहेत.

आज दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई येथे पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत . या शहरांमधील इंधनाच्या दरांमध्ये खूपच फरक आहे. या चार शहरांपैकी, कोलकातामध्ये पेट्रोलचे दर सर्वात महाग आहेत. जे मुंबईपेक्षा प्रति लिटर २.३० ने जास्त आहेत. या शहरांमध्ये कोलकातामध्ये डिझेलचा दरही सर्वाधिक होता जो प्रति लिटर ९९.८२ होता. आज या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहिले. यादीतील सर्व १४ शहरांमध्ये पेट्रोलचा भाव १०० रुपये प्रति लिटरपेक्षा जास्त होता. पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत अनेक ठिकाणी सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. चेन्नई, मथुरा आणि मेरठमध्ये सीएनजी प्रति किलो २ रुपयांनी महाग झाला आहे. मुंबई आणि बंगळूरुमध्ये प्रत्येकी १ रुपयाने दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

पेट्रोलचे दर -

बंगळुरू - १११.६८ रुपये

भुवनेश्वर - १०८.९७ रुपये

जयपूर - ११३.१९ रुपये

लखनऊ - १०१.८६ रुपये

पाटणा- ११३.३७ रुपये

तिरुअनंतपुरम - ११५.४९ रुपये

हैदरबाद - ११६.१५ रुपये

डिझेल दर -

बंगळुरू - ९९.५६ रुपये

भुवनेश्वर - १०८.६८ रुपये

जयपूर - ९८.२५ रुपये

लखनऊ - ९५.२५ रुपये

पाटणा- ९९.३६ रुपये

तिरुअनंतपुरम - १०४.४० रुपये

हैदरबाद - १०४.२३ रुपये

सीएनजीचे दर -

मुंबई - ८९ रुपये

चेन्नई - ९९.५० रुपये

बंगळुरू - ९८ रुपये

मथुरा - १०२ रुपये

मेरठ -९५.५० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com