Petrol Diesel : दिवाळीआधी केंद्र सरकारचा मोठा निर्णय! पेट्रोल-डिझेलच्या टॅक्समध्ये बदल; तुमच्या खिशावर होणार का परिणाम?

Petrol Diesel Price Update : केंद्र सरकारने पेट्रोलच्या निर्यातीवरील विंडफॉल टॅक्स प्रति लिटर २.५० रुपये केला असून, डिझेलवरील कर ८.५० रुपयांवर आणला आहे.
पेट्रोल-डिझेलवरील करावर केंद्र सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या तुमच्या खिशावर काय होणार परिणाम?
Petrol diesel price cuts saam tv
Published On: 

India petrol diesel windfall tax changes October : केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या निर्यातीवरील 'विंडफॉल टॅक्स' (अप्रत्याशित कर) बाबत गुरुवारी उशिरा एक मोठा निर्णय घेतला आहे. या नव्या बदलांनुसार, आता पेट्रोलच्या निर्यातीवर प्रति लीटर २.५० रुपये कर आकारला जाईल, तर डिझेलच्या निर्यातीवरील कर आधीच्या तुलनेत कमी करण्यात आला आहे. पण या निर्णयाचा देशांतर्गत बाजारात मिळणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या किरकोळ किमतींवर थेट परिणाम होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

गुरुवारी रात्री उशिरा सरकारने पेट्रोलवरील निर्यात कर ₹2 ने वाढवून प्रति लिटर ₹2.50 केला आहे, तर डिझेलवरील शुल्क ₹16 वरून कमी करून प्रति लिटर ₹8.50 केले आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, हे नवीन दर आज, १६ ऑक्टोबर २०२६ पासून लागू झाले आहेत. सरकारच्या निर्णयानुसार, आता पेट्रोल निर्यातीवर प्रति लिटर ₹2.50 चा विंडफॉल टॅक्स आकारला जाईल. दरम्यान, डिझेल निर्यातीवरील कर प्रति लिटर ₹7.50 ने कमी करण्यात आला आहे. एव्हिएशन टर्बाइन फ्युएलच्या (एटीएफ) निर्यातीवरील शुल्कात कोणताही बदल झालेला नाही.

पेट्रोल-डिझेलवरील करावर केंद्र सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या तुमच्या खिशावर काय होणार परिणाम?
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ३००० रुपये जमा होणार? दिवाळीआधी सरकार घेणार मोठा निर्णय; वाचा सविस्तर

पेट्रोल आणि डिझेल महाग होईल का?

या निर्णयाचा देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर थेट परिणाम होणार नाही. सरकारने देशांतर्गत वापरासाठी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलवरील सध्याच्या करांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे फक्त निर्यात करातील बदलाच्या आधारावर सर्वसामान्य ग्राहकांसाठी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार नाहीत. पण भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रूड आईलचे दर वाढल्यास इंधनाच्या दरात वाढ होऊ शकते.

पेट्रोल आणि डिझेलचे दर कधी बदलतात?

पेट्रोल आणि डिझेलच्या किमती पूर्णपणे बाजारपेठेनुसार ठरवल्या जातात. भारतात इंधनाच्या किमती तेल विपणन कंपन्या ठरवतात, त्यावर सरकारचे नियंत्रण असते. भारतातील ९० टक्क्यांहून अधिक पेट्रोल पंपांवर सरकारी मालकीच्या कंपन्यांचे नियंत्रण आहे. नायरा आणि रिलायन्स-बीपीसारख्या खाजगी कंपन्या स्वतःच किमती वाढवतात किंवा कमी करतात. त्याशिवाय, इंधनाच्या किमती करांवरही अवलंबून असतात. जर इंधनावरील उत्पादन शुल्क जास्त असेल, तर कच्च्या तेलाच्या किमतीतील बदलांचा परिणाम तुलनेने कमी जाणवतो.

पेट्रोल-डिझेलवरील करावर केंद्र सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या तुमच्या खिशावर काय होणार परिणाम?
Maharashtra Rain Alert: पुणे, सोलापूरसह १० जिल्ह्यांत तुफान पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून 'यलो अलर्ट' जारी

पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर

रात्रीतून विंडफॉल टॅक्समध्ये झालेल्या बदलानंतर, एचपीसीएल, आयओसीएल आणि बीपीसीएलने शुक्रवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले. दिल्लीत पेट्रोलचा दर प्रति लिटर ₹१०२.१२ आणि डिझेलचा दर ₹९५.२० वर स्थिर आहे. मुंबई, पुण्यातही पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

पेट्रोल-डिझेलवरील करावर केंद्र सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या तुमच्या खिशावर काय होणार परिणाम?
SIR वरून वाद सुरू असतानाच आयोगाचा मोठा निर्णय; १७ राज्यांसाठी नवे आदेश

आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या किमतींमधील चढउतार विचारात घेण्यासाठी सरकार दर १५ दिवसांनी विंडफॉल कराच्या दराचा आढावा घेते. इंधनाची निर्यात आणि देशांतर्गत उपलब्धता यांच्यात संतुलन राखणे हा या कराचा उद्देश आहे.

भारताने जुलै २०२२ मध्ये इंधन निर्यातीवर प्रथमच विंडफॉल टॅक्स (windfall taxes) लागू केला होता, पण दोन वर्षांनंतर तो मागे घेतला. त्यानंतर इराणवरील अमेरिका-इस्रायल युद्धादरम्यान कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यानंतर सरकारने मार्च २०२६ मध्ये विंडफॉल टॅक्स पुन्हा लागू केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com