Rahul Gandhi: 'मत चोरी हे देशविरोधी कृत्य; पंतप्रधानांच्या वेळापत्रकावर निवडणुका होतात, राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर घाणाघात

Rahul Gandhi Targets EC and BJP: संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान राहुल गांधींनी निवडणूक आयोग आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला. मतांची चोरी ही देशविरोधी कृत्य असल्याचे म्हणत निवडणूक सुधारणा कराव्यात अशी मागणी राहुल गांधींनी केलीय.
Rahul Gandhi Targets EC and BJP
saam tv
Published On
Summary
  • राहुल गांधींनी मतांची चोरी ही देशविरोधी कृत्य असल्याचा आरोप केला.

  • निवडणूक आयोग आणि भाजपवर संसदेत जोरदार हल्लाबोल.

  • हिवाळी अधिवेशनात निवडणूक सुधारणांवर जोरदार चर्चा.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनच्या मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणीवर चर्चा सुरू आहे. यावेळी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. राहुल गांधींनी चर्चेदरम्यान निवडणूक आयोग आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. निवडणुकीत सुधारणा आवश्यक आहे. मशीन रीडेबल मतदार यादी राजकीय पक्षांना एक महिन्याआधी देण्यात आल्या पाहिजेत. मतदारांचे सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्याबाबतचा कायदाही बदलला पाहिजे. या सुधारणा सांगताना राहुल गांधींनी मतांची चोरी ही देशविरोधी कृत्य असल्याचं म्हटलं.

Rahul Gandhi Targets EC and BJP
EVM स्ट्रॉंग रूमच्या बाहेर स्वतःची खासगी सुरक्षा तैनात; निवडणूक आयोगावर शिंदेंच्या आमदाराला विश्वास नाही का? चर्चांना उधाण

भाजपवर शरसंधान

भाजप निवडणूक आयोग चालवत आहे. भाजप लोकशाही नष्ट करत आहे."सीईसीच्या निवडीतून सीजेआयला का काढून टाकण्यात आले? निवडणूक आयुक्तांना शिक्षा करण्याची तरतूद का काढून टाकण्यात आली?, असे प्रश्न करत राहुल गांधी यांनी भाजपवर शरसंधान केलंय. निवडणूक सुधारणांवरील चर्चेत बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आक्रमकपणे भाजपवर टीकास्त्र डागलं. राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात भारत देशाला कपड्याची उपमा दिली. यावेळी राहुल गांधींनी आसामी गमच्छांपासून ते कांचीपुरम साड्यांपर्यंत सर्व गोष्टींवर चर्चा केली.

देशाला कपड्याची उपमा- राहुल गांधी

कापड्याची उपमा देत देशातील लोकशाहीवर होणाऱ्या हल्ल्यावरून त्यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं. खादी हे फक्त एक कापड नाही तर ते भारताचा आत्मा आहे. प्रत्येक प्रदेश त्याच्या विशिष्ट कापडांसाठी ओळखला जातो. आणि म्हटले की आपला देश एका कापडासारखा आहे. राष्ट्राचे प्रतिबिंब त्याचे कपडे असतात. राष्ट्राचे सर्व धागे सारखेच असतात. आपले राष्ट्र १.५ अब्ज लोकांचा देश आहे. राष्ट्राचे सर्व धागे सारखेच असतात,असं राहुल गांधी म्हणाले.

Rahul Gandhi Targets EC and BJP
Rahul Gandhi: राहुल गांधी अ‍ॅक्शन मोडवर, बिहारमधील पराभवानंतर काँग्रेसच्या ७ बड्या नेत्यांची हकालपट्टी

खासदारांचा गोंधळ

निवडणूक सुधारणेवरती बोलताना राहुल गांधींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही टीका केली. आरएसएस देशातील सर्व संस्थांवर कब्ज करत आहे. तेथे आपल्या विचारधारेचे लोक बसवत आहे. देशातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू हे आरएसएसचे आहेत. राहुल गांधींच्या या विधानानंतर सत्ताधारी पक्षाच्या खासगारांनी गोंधळ सुरू केला. त्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी राहुल गांधींना फक्त निवडणूक सुधारणांवर बोलण्यास सांगितले. इतर कोणत्याही संघटनेचा उल्लेख करू नये असे सांगितले.

निवडणूक आयोग आणि सरकारचं साटंलोटं - राहुल गांधी

सत्ताधारी पक्षाच्या गदारोळावर उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, "मी काहीही चुकीचे बोललो नाहीये. शैक्षणिक संस्था ताब्यात घेण्यात आल्यात. कुलगुरूंची नियुक्ती त्यांच्या गुणवत्तेवर नव्हे तर एका संस्थेशी असलेल्या त्यांच्या संलग्नतेवर आधारित होत आहे. सीबीआय, ईडीमध्ये एका संस्थेशी संबंधित लोकांना बसवण्यात आलंय. इतकेच नाहीतर देशातील तिसरी सर्वात मोठी संस्था असलेली निवडणूक आयोगावरही आरएसएसचा कब्जा आहे. त्यातून आरएसएस देशातील निवडणुका नियंत्रित करत आहेत.

माझ्याकडे याचे पुरावे देखील आहेत. भाजप लोकशाहीचे नुकसान करण्यासाठी निवडणूक आयोगाचा वापर करतेय. सीईसी नियुक्ती प्रक्रियेतून सरन्यायाधीशांना काढून टाकण्यात आले. इतर कोणत्याही पंतप्रधानांनी असं केले नाही. डिसेंबर २०२३ मध्ये कोणत्याही निवडणूक आयुक्तांना शिक्षा करणे शक्य नाहीय. आयोगाच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी हे बदल करण्यात आले. सीसीटीव्ही आणि डेटाबाबतचे नियम बदलण्यात आलेत. त्यामुळे निवडणूक आयोग आणि सरकारचं साटंलोटं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com