EVM स्ट्रॉंग रूमच्या बाहेर स्वतःची खासगी सुरक्षा तैनात; निवडणूक आयोगावर शिंदेंच्या आमदाराला विश्वास नाही का? चर्चांना उधाण

Shinde Mla Guards Outside Evm Rooms: जळगावच्या भडगाव आणि पाचोरा येथे ईव्हीएम स्ट्रॉंग रूमच्या बाहेर शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी खासगी सुरक्षा तैनात केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
Private security guards deployed outside the EVM strong room in Jalgaon, triggering a political debate.
Private security guards deployed outside the EVM strong room in Jalgaon, triggering a political debate.Saam Tv
Published On

जळगाव: नगरपंचयात आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल हा 21 डिसेंबरला लागणार आहे. हा निकाल आधी 3 डिसेंबरला लागणार होता. मात्र औरंगाबाद आणि नागपूर खंडपीठाने 21 तारखेला हा निकाल लावावा असे निर्देश निवडणूक आयोगाला दिले. त्यामुळे उमेदवारांची धाकधूक ही दिवसागणिक वाढतच आहे. मतदान झालेले सर्व ईव्हीएम आता स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आले आहे. ईव्हीएमसोबत छेडछाड केला जाईल असा आरोप महाविकासआघाडी करत असताना आता यामध्ये शिंदे गटाच्या आमदारांना पोलिस आणि प्रशासनावर भरोसा नसल्याचे चित्र आहे.

कारण शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी भडगाव आणि पाचोरा या ठिकाणच्या स्ट्रॉंग रूमला स्वतःची खासगी सुरक्षा व्यवस्था तैनात केल्याचे दिसून आले आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. पाचोरा आणि भडगाव नगरपालिकेत शिवसेना शिंदे गट विरुद्ध भाजप असा जोरदार सामना रंगला आहे. प्रचारादरम्यान दोन्ही पक्षांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले होते. मतदान ईव्हीएमध्ये बंद झाल्यानंतर आता ईव्हीएम स्ट्रॉंग रूममध्ये बंदिस्त असून 21 डिसेंबरला निकाल लागणार आहे.

Private security guards deployed outside the EVM strong room in Jalgaon, triggering a political debate.
Maharashtra Politics : राज ठाकरेंनंतर भाजप नेत्याचा आयोगावर गंभीर आरोप; थेट निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी

सत्ताधारी आमदाराला पोलिसांवर भरोसा नाही का?

पाचोरा आणि भडगाव येथील ईव्हीएम स्ट्रॉंग रूमच्या बाहेर गणवेशधारी खाजगी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. या निर्णयाने स्थानिक राजकारणात चर्चेला उधाण आले आहे.शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनीच या सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली असल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही ठिकाणी शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यात जोरदार सामना रंगलेला आहे.

Private security guards deployed outside the EVM strong room in Jalgaon, triggering a political debate.
धुळ्यात अवैध देहविक्रीच्या व्यवसायावर पोलिसांचा छापा; झोपड्यांवरही बुलडोझर फिरवला

सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनीच ईव्हीएम स्ट्रॉंग रूमच्या बाहेर खाजगी सुरक्षा रक्षक तैनात केल्याने काही राजकीय विरोधकांनी या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला आहे. स्थानिक राजकीय विश्लेषकांच्या मते, यामुळे निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकतेसंदर्भात चर्चा होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com