

लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
लोकसभा सुरू होताच काही मिनिटांत विरोधकांचा गोंधळ
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा लोकसभेत होते उपस्थित
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. राज्यसभा आणि लोकसभेचे कामकाज ११ वाजता सुरू झाले. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे दोघेही सभागृहात उपस्थित होते. पण कामकाज सुरू होताच अवघ्या काही मिनिटांत लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह सभागृहात आल्यानंतर तसंच लोकसभेचे कमकाज सुरू झाल्यानंतर विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला. त्यानंतर लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले. शेवटच्या दिवशी नेमकं काय होतंय याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. अमित शाह आणि पीएम मोदी पेपरफुटी प्रकरण आणि विद्यार्थी आंदोलनावर काय उत्तर देतात याची वाट संपूर्ण देश पाहत होता. पण त्यापूर्वीच लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले. त्यामुळे सर्वांना धक्का बसला.
विद्यार्थी आंदोलनावर चर्चा व्हावी यासाठी विरोधक आक्रमक झाले होते. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधक विद्यार्थी आंदोलनावर चर्चा व्हावी ही एक मागणी करत गोंधळ घालत होते. त्यामुळे दोन्ही सभागृहाचे कामकाज सुरळीत होत नव्हते. यावरून सत्ताधारी नाराज होते. याच मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक दोघेही सभागृहात आणि बाहेर आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. बुधवारी गृहमंत्री अमित शाह यांनी माध्यमांसमो येत आम्ही चर्चेसाठी तयार असून मी विरोधकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देईन असे सांगितले होते. त्यामुळे आजचा दिवस हा खूपच महत्वाचा होता.
अमित शाह कामकाजाच्या शेवटच्या दिवशी नेमकं काय उत्तर देणार आणि काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज अमित शाह आणि पीएम मोदी दोघेही सभागृहात उपस्थित होते. पण ते येताच सभागृहात विरोधकांनी गोंधळ घालत घोषणाबाजी केली. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शांतता ठेवत कामकाज सुरळीत करण्याची विमंती विरोधकांकडे केली पण विरोधकांकडून गोंधळ सुरू होता. शेवटी लोकसभा अध्यक्षांनी कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.