पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नवा व्हिडिओ! धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मोदी सरकारनं घेतला मोठा निर्णय

Narendra Modi Shares New Video : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा सुधारणेबाबतचा एक नवीन उपक्रम जाहीर केला असून, शिक्षण व्यवस्था बळकट करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या उच्च-स्तरीय कार्यगटाच्या प्रमुखपदी नंदन निलेकणी यांची नियुक्ती केली आहे.
Narendra Modi Shares New Video
PM MODI ANNOUNCES HIGH-LEVEL EXAM REFORM TASK FORCE LED BY NANDAN NILEKANIsaam tv
Published On

नीट पेपर फुटीच्या प्रकरणामुळे धर्मंद्र प्रधान यांना आपल्या पदावरून पायउतार व्हावे लागले. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँक्रोच जनता पक्ष आणि विद्यार्थ्यांकडून देशभरात आंदोलन केलं जात होतं. त्यानंतर मोदी सरकार अॅक्शन मोडवर आले असून त्यांनी एक मोठा निर्णय घेतलाय. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रिल स्टाईलने एक व्हिडिओ पोस्ट केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली परीक्षा सुधारणांसाठी एका उच्च-स्तरीय कार्यगटाची (Task Force) स्थापना केली आहे. परीक्षा व्यवस्था बळकट करण्याच्या दिशेने आणि परीक्षा निष्पक्ष, पारदर्शक, सुरक्षित व तंत्रज्ञानावर आधारित बनवण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

Narendra Modi Shares New Video
CJP नंतर आता E20 जनता पार्टीची एंट्री; 100% पेट्रोलसाठी सोशल मीडियावर मोहीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षांमधील सुधारणांबाबत एक महत्त्वाची घोषणा केली आहे. इन्स्टाग्रामवरील एका व्हिडिओ संदेशात त्यांनी एका उच्च-स्तरीय (टास्क फोर्स) स्थापनेबाबत माहिती दिली आहे. परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी आणि ती अधिक पारदर्शक बनवण्यासाठी, तंत्रज्ञान तज्ज्ञ नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली एका उच्च-स्तरीय स्थापना करण्यात आली असल्याचे पंतप्रधानांनी आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलं.

इन्स्टाग्रामवर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "मित्रांनो, भारत सरकार विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी सातत्याने अनेक पावले उचलत आहे. ज्यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला, ते आज तुरुंगात खितपत पडले आहेत. आम्ही 'फास्ट-ट्रॅक' न्यायालये स्थापन केली आहेत. आम्ही संसदेत एक नवीन कायदा करण्याच्या दिशेनेही वाटचाल करत आहोत.यात कठोर उपाययोजनांची तरतूद असेल. तरीही, आपण भविष्याचा विचार केला पाहिजे.

Narendra Modi Shares New Video
शिक्षणमंत्र्याचा राजीनाम्यानंतर मोदी सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; लोकसभेत सादर मांडणार नवं विधेयक

पंतप्रधान मोदी म्हणाले की, "आपली परीक्षा प्रणाली विश्वसनीय आणि पारदर्शक असावी, तसेच त्यात तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर केला जावा. या सर्व बाबी लक्षात घेऊन, जागतिक स्तरावर ख्यातीप्राप्त तंत्रज्ञान तज्ज्ञ नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली एक उच्च-स्तरीय टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com