Pahalgam Attack : दहशतवादी गटांना फंडिंग, प्रशिक्षणासाठी पाकची मदत | VIDEO

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानचा खरा चेहरा समोर; संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ यांनी दहशतवाद्यांना पैसे, शस्त्र आणि प्रशिक्षण दिल्याची निर्लज्ज कबुली दिली आहे. या वक्तव्यानंतर भारतात संतापाची लाट उसळली आहे.
Pahalgam Attack
Pahalgam AttackSaam tv
Published On

Pahalgam Attack News : आधी दहशतवादी कृत्यं लपवणाऱ्या कुरापतखोर पाकड्यांचा बुरखा त्यांच्याच संरक्षणमंत्री ख्वाजा असिफने फाडलाय... नेमकं काय घडलंय? आणि ख्वाजा असिफने कशाची कबुली दिलीय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

ऐकलंत.... हे आहेत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ... पाहा किती निर्लज्जपणे दहशतवाद्यांना पैसे, शस्त्र आणि प्रशिक्षण दिल्याचं कबुल करतोय.... ब्रिटनमधील एका नामांकित वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ख्वाजा असिफने पाकड्यांचा घाणेरड्या खेळाचा पत्ता उघड केलाय..

Pahalgam Attack
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्यामागे 'हमास'चा हात; हमास, हाफिज आणि मसूदनेच रचला कट

पहेलगाम दहशतवादी हल्ल्यात 28 भारतीयांचा मृत्यू झाला.. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झालीय... दोन्ही देशांमध्ये युद्ध भडकण्याची चिन्हं आहेत.. त्यापार्श्वभुमीवर पाकिस्तानचा संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ बिनधास्तपणे पाकिस्तान दहशतवाद्यांना पैसे, प्रशिक्षण आणि शस्त्र पुरवत असल्याचा कबुलीनामाच दिलाय.. एवढंच नाही तर लष्कर ए तैयबासारख्या दहशतवादी संघटना पोसल्याचंही मान्य केलंय....नेमकं काय म्हणालेत ख्वाजा असिफ? पाहूयात...

दहशतवादी गटांना फंडिंग, प्रशिक्षणासाठी पाकची मदत

अमेरिका, ब्रिटनसाठी 30 वर्षांपासून हा घाणेरडा प्रकार

अमेरिका, ब्रिटनसारख्या देशांसाठी हे कृत्य केलं

लष्कर ए तैयबा संघटना आता नष्ट झाली

Pahalgam Attack
Pahalgam Attack: लष्कर-ए- तैयबाला जोरदार दणका,दहशतवादी आसिफ आणि आदिलचं घर उद्धवस्त

संरक्षण मंत्री ख्वाजा असिफने एवढ्या निर्लज्जपणे दिलेल्या कबुलीनंतर भारत आणखीच संतापलाय.. तर दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकड्यांचा खरा चेहरा आता समोर आलाय.. त्यामुळे पाकड्यांच्या कायदेशीर नांग्या ठेचण्यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर उचलून पाकिस्तानची कोंडी करण्याची गरज आहे.. तरच पाकड्यांचा गुडघ्यातील मेंदू ठिकाणावर येईल....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com