Pakistan : पाकिस्तानी लष्करावर भीषण हल्ला; बलुचिस्तानमध्ये २५ जवान ठार, गाड्या पेटवल्या अन्...

Pakistan Balochistan Attack News : पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला झाल्याचा दावा BLAने केला आहे. या हल्ल्यात २५ जवान ठार आणि दोन लष्करी वाहने नष्ट केल्याचे संघटनेने म्हटले आहे. सुराबमध्येही ७ जवान ठार केल्याचा दावा करण्यात आला आहे.
Pakistani Army convoy in Balochistan, with 25 soldiers allegedly killed
Pakistani Army convoy in Balochistan, with 25 soldiers allegedly killedAI Image
Published On
Summary
  • बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला

  • जियारत क्रॉस परिसरातील हल्ल्यात २५ पाकिस्तानी जवान ठार

  • BLAने हल्ल्याचा १ मिनिट ११ सेकंदांचा कथित व्हिडिओ केला व्हायरल

  • पाकिस्तानच्या लष्कराकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही

पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये गुरुवारी पाकिस्तानी लष्करावर मोठा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्याची जबाबदारी बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (BLA) स्वीकारली आहे. या कारवाईत पाकिस्तानी लष्कराचे २५ जवान ठार झाल्याचा दावा BLAकडून करण्यात आला आहे. तसेच लष्कराच्या दोन वाहनांना आग लावून ती नष्ट केल्याचेही संघटनेने म्हटले आहे.

‘द बलुचिस्तान पोस्ट’च्या वृत्तानुसार, BLAच्या प्रवक्त्याने या हल्ल्याबाबत माहिती दिली. जियारत क्रॉस परिसरात पाकिस्तानी लष्कराचा ताफा जात असताना BLAच्या सैनिकांनी त्याला लक्ष्य केल्याचे संघटनेने म्हटले आहे. हल्ल्यात लष्कराच्या वाहनांवर गोळीबार करण्यात आला. यामध्ये दोन वाहने नष्ट करण्यात आली असून, त्यात एका लष्करी ट्रकचाही समावेश असल्याचा दावा करण्यात आला आहे. हल्ल्यानंतर BLAने सुरुवातीला पाकिस्तानी लष्कराचे १८ जवान ठार झाल्याचा दावा केला होता. मात्र, त्यानंतर संघटनेने मृतांचा आकडा वाढवत २५ जवान ठार झाल्याचे म्हटले आहे. या दाव्याला पाकिस्तानच्या लष्कराकडून अधिकृत दुजोरा मिळाल्याची माहिती मात्र समोर आलेली नाही.

Pakistani Army convoy in Balochistan, with 25 soldiers allegedly killed
Heart Attack : हार्ट अटॅक येण्यापूर्वी ३० दिवस आधी शरीरात दिसतील 'ही' ६ लक्षणे; दुर्लक्ष करू नका नाहीतर....

दरम्यान, BLAने या हल्ल्याचा १ मिनिट ११ सेकंदांचा व्हिडिओ ट्रेलर व्हायरल केला आहे. या व्हिडिओमध्ये जियारत क्रॉस परिसरातील हल्ल्याचे दृश्य असल्याचा दावा संघटनेने केला आहे. घटनास्थळी मृतदेह आणि कथितरित्या ताब्यात घेतलेली शस्त्रेही व्हिडिओमध्ये दाखवण्यात आल्याचा दावा BLAने केला आहे.

Pakistani Army convoy in Balochistan, with 25 soldiers allegedly killed
Fatty Liver : तुम्हाला सतत थकवा जाणवतोय, भूक लागत नाही? फॅटी लिव्हरची 'ही' लक्षणे दुर्लक्ष करू नका, नाहीतर...

याचदरम्यान सुराबमधील हाजिका परिसरात BLAच्या ‘स्पेशल टॅक्टिकल ऑपरेशन्स स्क्वाड’ने (STOS) आणखी एका कारवाईचा दावा केला आहे. स्फोटकांनी भरलेले वाहन रिमोटने उडवण्यात आल्याचे संघटनेने म्हटले आहे. या स्फोटात लष्कराचे एक वाहन नष्ट झाले असून सात जवान ठार झाल्याचा दावा BLAने केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com