45 पाकिस्तानी सैनिक ठार; देशात आणीबाणीची परिस्थिती; सर्व महामार्ग बंद

Pakistan Army Convoy Attack In Balochistan Mastung: बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावर भीषण हल्ला; 45 सैनिक ठार झाल्याचा दावा. संपूर्ण परिसरात हाय अलर्ट, महामार्ग बंद करून मोठी सर्च ऑपरेशन सुरू.
Security forces conduct rescue and search operations after a deadly attack on a Pakistan Army convoy in Balochistan’s Mastung district.
Security forces conduct rescue and search operations after a deadly attack on a Pakistan Army convoy in Balochistan’s Mastung district.saam tv
Published On

पाकिस्तानच्या अशांत बलुचिस्तानमध्ये आर्मीच्या ताफ्यावर झालेल्या भीषण हल्ल्यानंतर संपूर्ण सुरक्षा यंत्रणेला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. गुरुवारी मस्तुंग जिल्ह्यात बलूच लिबरेशन आर्मीने लष्कराच्या ताफ्याला लक्ष्य केले. हा हला या वर्षातील सर्वात मोठ्या हल्ल्यांपैकी एक मानला जात आहे. या हल्ल्यात 45 हून अधिक पाकिस्तान सैनिक ठार झाल्याचा दावा बीएलएने केला आहे. मात्र सरकार आणि लष्कराने या सगळ्याला दुजोरा दिला नाहीये. लष्कराच्या ताफ्यावर हल्ला झाल्याने पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी केवळ मान्य केले असून, घटनेनंतर मोठ्या प्रमाणावर मदत आणि सुरक्षा मोहीम सुरू करण्यात आल्याचे सांगितले.

Security forces conduct rescue and search operations after a deadly attack on a Pakistan Army convoy in Balochistan’s Mastung district.
Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

हल्ल्यानंतर बलुचिस्तानची राजधानीमध्ये अनेक मोठ्या हॉस्पिटलमध्ये मेडिकल इमर्जनसी घोषित करण्यात आली आहे. तसेच इतर प्रमुख हॉस्पिटलला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मस्तुंग येथून जखमी सुरक्षा कर्मचाऱ्यांना रुग्णवाहिकेद्वारे तातडीने हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यात आले. जखमींना बाहेर काढण्यासाठी आणि परिसरात तैनात सैनिकांना मदत पोहोचवण्यासाठी हेलिकॉप्टरची देखील मदत घेण्यात आली. या हल्ल्यात किती सैनिक जखमी झाले किंवा त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, याबाबत पाकिस्तानने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.

Security forces conduct rescue and search operations after a deadly attack on a Pakistan Army convoy in Balochistan’s Mastung district.
Maharashtra News Live Update: संजय दिना पाटील यांच्या विधानाच्या निषेधार्थ धुळ्यात जोडो मारो आंदोलन

या हल्ल्यात किती सैनिक जखमी झाले किंवा त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, याबाबत पाकिस्तानने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. घटनेनंतर बचाव कार्य आणि शोध मोहीम वेगाने राबवता यावी यासाठी क्वेटा-कराची राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक अनेक ठिकाणी

थांबवण्यात आली. संपूर्ण परिसरात सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणावर सर्च ऑपरेशन सुरू केले असून अतिरिक्त जवान तैनात केले आहेत. दरम्यान, बीएलएच्या दाव्यांना अद्याप स्वतंत्रपणे दुजोरा मिळालेला नाही आणि पाकिस्तानी लष्कराने आपल्या नुकसानीचा अधिकृत तपशील जारी केलेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com