

गडचिरोली गुप्त माहितीच्या आधारे गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने महाराष्ट्र–छत्तीसगड सीमेवरील बालबेडा जंगल परिसरात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त केला. विशेष शोध मोहिमेदरम्यान जमिनीत पुरून ठेवलेले सुमारे ५ ते ६ टन वजनाचे लेथ मशीन, १५० क्लेमोर व बीजीएल पाईप्स, २२० बारा बोअर पाईप्स, रायफल निर्मितीचे साहित्य आणि अन्य सामग्री जप्त करण्यात आली.
आमदार धनंजय मुंडे टाकळी गावात येऊन आक्रमक होत पोलिसांवरती गंभीर आरोप करत दहावा आरोपी का अटक होत नाही असा सवाल उपस्थित केल्यानंतर SIT ने आपल्या तपासाची चक्र फिरवत तपासाला गती देत या प्रकरणात धागेद्वारे कुठपर्यंत आहेत हे शोधण्याचे काम सुरू आहे काही वेळापूर्वी हत्या प्रकरणातील एक संशयित SIT ने ताब्यात घेतला असून त्याची चौकशी केली जात आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
बीड जिल्ह्यात आज दिवसभर वेगवेगळ्या भागांमध्ये पावसाने जोर वाढवला असून बीड तालुक्यातील आंबे सावळी परिसरात जोरदार पाऊस झाला हा पाऊस दोन तास सुरू होता झालेल्या पावसामुळे शेताला तलावाचे स्वरूप आले असून शेतकऱ्यांमध्ये आता आनंदाचे वातावरण पाहण्यास मिळत आहे. या पावसामुळे शेतातील लागवडी ना आता सुरुवात होणार आहे.
केतन अग्रवाल प्रकरणात नवनवीन खुलासे समोर
सिया चे चेतन सोबत प्रेम संबंध असल्याचा केतन ला होता संशय
केतन ने फोन केल्यावर सिया चा नंबर सातत्याने होता "व्यस्त"
संशय आल्याने "तुम्ही सिया बाबत संपूर्ण माहिती घेतलीय का?" केतनने २ वेळा वडिलांना विचारला होता प्रश्न
केतन सोबत असताना सिया नेहमीच चेतनचा विषय काढत असायची.
निफाड तालुक्यातील अनेक भागात संध्याकाळच्या परिसरात आज जोरदार पावसाने दमदार हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
या पावसामुळे खरीप पिकांच्या पेरणीला वेग येण्याची शक्यता असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागात आनंदाचे वातावरण आहे.
नाशिकच्या मनमाडमधील प्रसिद्ध गुरुद्वारा गुप्तसर साहेब येथे शिख धर्मियांचे सहावे गुरु श्री गुरु हरगोबिंद साहेब यांची ५५७ वी जयंती प्रकाश पर्व म्हणून उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजित सिंग यांच्या उपस्थित नगर कीर्तन व मिरवणूक काढण्यात येऊन ती छोटा गुरुद्वारा येथे समाप्त झाली यावेळी मोठ्या संख्येने शीख बांधव सहभागी झाले होते
बीड -
गेल्या दोन दिवसापासून बीड जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात दमदार पाऊस पाहायला मिळत आहे
अशातच आज बीडच्या माजलगाव येथील धारूर तालुक्यातील हिंगणी गावातील सरस्वती नदीला पहिल्याच पाण्यात पूर आल्याचे पाहायला मिळत आहे
दमदार पावसामुळे सरस्वती नदी दुथडी भरून वाहत आहे यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले
दमदार पावसाची शेतकऱ्यांकडून आणखी ही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
बीड - गौतम खंडागळे यांना 'अष्टपैलू समाजभूषण' पुरस्कार प्रदान
सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल गौतम खंडागळे यांना 'अष्टपैलू समाजभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद असलेले तसेच चित्रपट निर्माते अल्ताफ शेख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
उद्धव ठाकरे यांची धाराशिवमध्ये सभा
ओमराजे निंबाळकर यांच्या मतदारसंघात सभा
उध्दव ठाकरे कधीही जबाबदारी टाळणारा नाही
या सभा नाहीत कौटुंबिक बैठक आहे
विरार -
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -
राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून होणाऱ्या दिल्ली- मुंबई- बडोदरा रस्त्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पाहणी केली
पालघर ते अंबाडी गावापर्यंत हा रस्ता बनवण्यात आलेला आहे
या रस्त्याला जोडणाऱ्या विरार अलिबाग कॉरिडोर तसेच वेगवेगळे स्पर्श देखील जोडले गेले आहेत
यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी कमी होणार आहे
ठाण्यामध्ये होणारी वाहतूक कोंडी देखील कमी होण्यास मदत होणार आहे
शहरातील वाहतूक कोंडी देखील सोडवण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे
या रस्त्याचे काम देखील वेगाने सुरू आहे जोरात सुरू आहे
नदीच्या ठिकाणी बांधण्यात येणाऱ्या पुलाला उशीर होत असल्यामुळे नोव्हेंबर पर्यंत त्या ब्रिजचे काम पूर्ण होईल
विलास घुले हत्या प्रकरणात मोठी अपडेट
पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ कार आणि चाकू एसआयटीकडून जप्त
विलास घुले हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग
घटनास्थळावर ज्या कारने आरोपी दाखल झाले ती कार एसआयटीने जप्त केली
-तर ज्या चाकुने विलास घुलेंवर वार करण्यात आला तो चाकू आरोपीच्या शेतातून जप्त करण्यात आला
हत्या प्रकरणाचा संपूर्ण तपास अंतिम टप्प्यात
ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय
परिवर्तन पॅनलचा निवडणुकीत पराभव
रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस
सखल भागात साचले पाणी
उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण
मुसळधार पावसानंतर चाकणमधील साईड गटार बंद झाल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. परिणामी मोठ्या प्रमाणात पाणी पुणे-नाशिक महामार्गावर साचले आणि महामार्गाने अक्षरशः नदीचे स्वरूप धारण केले. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला असून काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. चारचाकी, दुचाकी आणि मालवाहू वाहनांसह नागरिकांना पाण्यातूनच मार्ग काढावा लागत आहे.
विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून, वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
मात्र, पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास वसई-विरारमधील सखल भागांमध्ये पुन्हा पाणी साचण्याची शक्यता असून, जनजीवन विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गेले दोन दिवस काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने आज दुपारनंतर दमदार हजेरी लावली आहे. गेले दोन तास सिंधुदुर्गात पावसाची संततधार सुरू आहे. कणकवली, कुडाळ, सावंतवाडी,दोडामार्गसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसाचा जोर दिसून येत आहे. हवामान विभागाकडून आज येलो अलर्ट देण्यात आला असून या संततधार पावसामुळे नदी ओढ्याच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. तर शेतीच्या कामांनाही वेग येणार आहे.
मावळ तालुक्यातील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर कार्ला फाटा परिसरात स्टील पट्ट्यांची वाहतूक करणारा ट्रेलर रस्त्यात बंद पडल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर सुमारे ४ ते ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. गेल्या तासभरापासून वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू असून ट्रॅफिक पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात झालेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. येनगाव, वडगाव पाटण, तरोडा, सावरगाव, वडशिंगीसह अनेक गावांमध्ये शेतांमध्ये पाणी शिरून पेरणी झालेल्या शेताचे मोठे नुकसान झाले असून अनेक शेतरस्ते वाहून गेले आहेत. खरीप हंगामासाठी नव्याने करण्यात आलेली पेरणी वाहून गेल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. तहसीलदार पवन पाटील यांनी महसूल विभागाच्या पथकासह नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. शासनाने तातडीची आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे...
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे विविध प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामस्थांचे आमरण उपोषण चौथ्या दिवशीही सुरू आहे. प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. शासन निर्णयानुसार पात्र अतिक्रमणधारकांचे नियमानुकूलकरण, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजुरी, अपात्र लाभार्थ्यांचे पुनर्वसन तसेच सोनाळा-अकोट मार्गाची हद्द निश्चित करून जमिनींचे मोजमाप करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. शेकडो कुटुंबांच्या प्रश्नांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन न्याय द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
- सोलापूर जिल्ह्यात संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात
- अगदी सकाळपासून जिल्ह्यात सर्वत्र कडक ऊन मात्र दुपारनंतर मुसळधार पावसाची हजेरी
- पावसाने हुलकावणी दिल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर उभारले होते मोठे संकट
- जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर, अक्कलकोट अशा अनेक भागात पावसाची जोरदार हजेरी
पंढरपुरात पावसाची हजेरी
अनेक दिवसांच्या विश्रांती नंतर आज पंढरपुरात पावसाने हजेरी लावली.
आज दुपारी ढगाळ वातावरण तयार झाल्यानंतर पावसाने हजेरी लावली.
पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे.
यवतमाळ जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून जिल्ह्यातील झिरो ते ५ वर्षे वयोगटातील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक नियोजन केले आहे.दोन थेंब पोलिओचे, आरोग्याच्या सुरक्षेचे या ब्रीदवाक्यानुसार यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख पाच हजार एकशे सत्तावीस बालकांना पोलिओ लस बांधण्यात येणार आहे. यात शहरी आणि ग्रामीण भागातील बालकांचा समावेश आहे.
उद्या सकाळी ११ नंतर नसरापूर प्रकरणात न्यायालय शिक्षा सुनावणार
नसरापूर प्रकरणात आरोपी भीमराव कांबळे दोषी
न्यायालयाने २ दिवसांपूर्वी झालेल्या सुनावणी दरम्यान ठरवलं दोषी
नसरापूर घटनेतील आरोपीला फाशी होणार का जन्मठेप याकडे उभ्या राज्याचे लक्ष
राज्यातील न्यायालयीन इतिहासात जलदगतीने सुनावणी झालेला हा पहिला खटला
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात समृद्धी महामार्गावरील चैनल क्रमांक १०५ जवळ भीषण अपघात झाला. चंद्रपूरहून मुंबईकडे निघालेल्या वॅगनार कारने मागून ट्रकला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कारमधील एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन पुरुष, दोन महिला आणि एका मुलीचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.
मुंबई गोवा महामार्गावर कुडाळ पावशी येथे आज सकाळी आयशर टेम्पो घरात घुसून अपघात झाला. सुदैवाने त्या घरात कोण राहत नसल्याने जिवीत हाणी टळली. मात्र या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे. या घरा समोर छोटी विहिर होती त्या विहिरीचा कठडा तोडून हा टेम्पो थेट घराच्या भिंतीवर आदळला. यात त्या घराचे व आयशर टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे.
माणगाव येथे मुंबई गोवा महामार्गावरील नवीन पुलाला खड्डे पडले आहेत. केवळ दहा दिवसांपूर्वी काळ नदीवरील हा पुल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. पहिल्याच पावसात पुलावर खड्डे पडू लागल्याने कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे पुलावरील संरक्षक कठड्यांचे काम पूर्ण झालेले नसतानाच वाहतूक सुरू करण्यात आल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
हिंगोली जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांना शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे मात्र या पेरण्या करत असताना बाजारपेठेत शेतकऱ्यांना बोगस खते औषधे आणि बियाणे मिळत असल्याचे प्रकार घडत असल्याने हिंगोलीत रविकांत तुपकर यांच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेने कृषिमंत्री दत्ता भरणे यांच्या फोटोला पैशांचा हार घालत निषेध केला आहे, बळीराजाची फसवणूक होत असताना दत्ता भरणे औषध कंपन्यांसोबत साटेलोटे करत असल्याचा गंभीर आरोप यावेळी आंदोलन करणाऱ्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे त्यामुळे आपण दत्ता भरणे यांच्या फोटोला हार घालून निषेध केल्याचं या आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी म्हटल आहे.
उद्धव ठाकरेची परभणीत सभा
या सभा नसून शिवसैनिकांच्या कौटुंबिक भेटी आहेत - उद्धव ठाकरे
खासदार ज्योती वाघमारे यांनी एकनाथ शिंदेंना दिली रामाची उपमा
देवेंद्र फडणीस यांना लक्ष्मणाची उपमा देत शिवसेनाच राज्यात मोठा भाऊ असल्याचं केलं सुतोवाच
राज्यात मोठा पक्ष कोणता सेना भाजपातील वाद पुन्हा चव्हाट्यावर?
TET पेपरफुटी प्रकरणातील 3 आरोपींना भिवंडीतील कोनगांव पोलिसांनी अटक केली आहे. या तिघांना आज भिवंडी कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
पोलिओ मुक्त भारत करण्यासाठी आज देशभर पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवले जात आहे यामध्ये देशातील सर्व लहान बालकांना पोलिओची लस देण्यात येणार आहे बारामतीत अहिल्यादेवी शासकीय रुग्णालयामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला
देशातून पोलिओचे संपूर्ण उच्चाटन करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत आज अमरावती महानगरपालिकेच्या वतीने शहरभर विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजले जात आहेत. शहरातील सुमारे 67 हजार बालकांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी 337 लसीकरण बूथ, 19 मोबाईल पथके आणि 29 ट्रान्झिट पथके कार्यरत आहेत
परभणीत उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यात निष्ठावंत शिवसैनिक
निष्ठावंतांच्या मेळाव्यात निष्ठावंत शिवसैनिकांची वेगळी झलक
ठाणे व पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीत संचालक पदाच्या निवडणुकीत निलेश सांबरे हे विजयी झाले आहेत. यांनी सेवा संस्था मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
सावंतवाडीतील मळेवाड म्हापसेकरवाडी येथे बिबट्याने मध्यरात्री गुरांच्या गोठ्यात घुसून गायीच्या वासरावर हल्ला करुन त्याला ठार केले. येथील शेतकरी गोविंद रघुनाथ मुळीक यांच्या घरा शेजारी असलेल्या गुरांच्या गोठ्यात हा थरारक प्रकार घडला. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाचे पथक घटनास्थळावर दाखल होऊन पंचनामा करण्यात आला आहे.
कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर गावातलं कोपेश्वर मंदिर ग्रामस्थांनी केलं बंद
आज पासून ग्रामस्थांची पर्यटकांसाठी गाव आणि मंदिरात प्रवेश बंदी
ग्रामस्थांनी सुरू केलं साखळी उपोषण
खिद्रापूर गावातील कोपेश्वर मंदिर परिसरातील 72 बांधकाम ठरवली आहेत अतिक्रमित
मात्र चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती देऊन न्यायालयीन प्रक्रिया झाल्याचा ग्रामस्थांचा दावा
माहिती न घेता संबंधित बांधकाम अतिक्रमण ठरवल्याचा ग्रामस्थांचा आरोप
:पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील भाविक श्री येणभर सचिन कालूराम यांनी श्री तुळजाभवानी मातेस ४९.४२० ग्रॅम वजनाचा सुवर्ण हार अर्पण करून आपली श्रद्धा व्यक्त केली श्री येणभार हे सहकुटुंब श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी तुळजापूर येथे आले असता त्यांनी मंदिर संस्थानकडे विधिवत सुवर्ण हार सुपूर्द केला. मंदिर संस्थानच्या नोंदीनुसार हा हार स्वीकारण्यात आला.
- महावितरणला अदानी पॉवरकडून स्वस्त वीज खरेदीस एमईआरसीची मंजुरी
- १,६०० मेगावॉट वीज खरेदीला महाराष्ट्र वीज नियामक आयोगाची हिरवी झेंडी दाखवली असल्याची माहिती
- अदानी पॉवरकडून ५.३० रुपये प्रतियुनिट दराने वीज खरेदी होणार
- महानिर्मितीच्या वीजदरापेक्षा अदानीची वीज स्वस्त असल्याने मंजुरी
विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेगावच्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचा आज वाशीम जिल्ह्यात दुसरा दिवस असून, शेगाव येथून पंढरपूरकडे निघालेल्या पालखीच वाशीम जिल्ह्यात भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात येत आहे. मालेगाव शहरात पालखी पोहोचलीय
ANC: जून महिना संपत आला तरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. गेल्या चार दिवसांपासून काही भागात हजेरी तरीही जिल्ह्यातील एकूण सरासरी पावसात मोठी घट झाली आहे. महसूल विभागाच्या २७ जून २०२६ पर्यंतच्या ताज्या अहवालानुसार, जिल्ह्याचा सरासरी पाऊस १२५.२ मिमी आहे. मात्र, प्रत्यक्षात केवळ ७१.१ मिमी पाऊस झाला असून, जिल्ह्यात तब्बल ४३.२ टक्के पावसाची तूट नोंदवली गेली आहे. यामुळे खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या असून, शेतकरी राजा मोठ्या आणि दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे,तालुकावार आकडेवारीवर नजर टाकल्यास, खुलताबाद तालुक्याला पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून तिथे केवळ ३३.४ टक्के पाऊस झाला (अर्थात ६६.६ टक्के तूट) आहे. दुसरीकडे सोयगाव तालुक्यात सर्वाधिक ११५.९ मिमी पाऊस झाल्यामुळे तेथील परिस्थिती तुलनेने चांगली आहे
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर असणार आहेत. धाराशिवचे बंडखोर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या मतदारसंघात धाराशिव मध्ये उध्दव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. दुपारी 3.30 वाजता ठाकरे धाराशिव मध्ये येणार असुन शहरातील सिध्दाई सिद्धी मंगल कार्यालयात ते कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा घेणार आहेत.
लोहगडावरील केतन अग्रवाल हत्याप्रकरणाच्या तपासाला वेग आला असून, सियाचे वडील प्रवीण गोयल आणि आई पूजा गोयल यांची लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तब्बल १२ तास कसून चौकशी केली. याआधी सियाचा भाऊ साहिल गोयलचीही दीर्घ चौकशी करण्यात आली होती. या चौकशीतून महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती असून, तपासात आणखी काही महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे..
सहा खासदार फुटी नंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सहा मतदार संघाच्या दौऱ्यावर आहेत. आज परभणीचे खासदार संजय जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर परभणीच्या अक्षदा मंगल कार्यालयामध्ये उद्धव ठाकरे यांचा निष्ठवंतांचा मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्यामध्ये शिवसेनेचे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत. त
सिया आणि चेतन ने गुगलवर शोधले होते खून करण्याचे पर्याय
लोहगड वरील कोणत्या ठिकाणावरून दरीत ढकलल्यास अपघात वाटेल? याचा देखील सिया आणि चेतन ने केला होता विचार
केतन ला विष देऊन ठार मारता येईल का? मारल्यानंतर स्वतःचा पोलिसांपासून बचाव कसा करायचा? दोघांनी गुगलवर शोधली माहिती
पोलिसांना काय सांगायचे, चौकशीदरम्यान कोणती भूमिका घ्यायची आणि संपूर्ण घटना अपघातासारखी कशी भासवायची, याबाबतही दोघांमध्ये चर्चा झाल्याचा तपास यंत्रणांना संशय
घटनेच्या काही दिवसांपूर्वी या दोघांनी लोहगड किल्ल्यावर जाऊन केतनला धक्का कसा द्यायचा, याचा सरावही केल्याची माहिती पोलिस तपासात उघड
केतनचा १८ जूनला सकाळी साडेदहाच्या सुमारास लोहगड किल्ल्यावरील हत्ती तलावाजवळील दरीत ढकलून खून करण्यात आला
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर असणार आहेत. धाराशिवचे बंडखोर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या मतदारसंघात धाराशिव मध्ये उध्दव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. दुपारी 3.30 वाजता ठाकरे धाराशिव मध्ये येणार असुन शहरातील सिध्दाई मंगल कार्यालयात ते कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा घेणार आहेत.खासदार ओमराजे निंबाळकर हे ठाकरे यांचे निष्ठावंत म्हणून परिचित होते. त्यांच्या पक्षांतराने अनेकांना धक्का बसला. यामुळे उद्धव ठाकरे ओमराजे निंबाळकर यांचा कसा समाचार घेतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं असून या मेळाव्यासाठी मोठी तयारी देखील करण्यात आली आहे.
पाचोर्याकडून गुजरातकडे जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सचा जळगावच्या चाळीसगावात अपघात झाला आहे.
चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स थेट रस्त्याच्या कडेला पलटी झाली.
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या गायरान फाट्याजवळ हा अपघात झाला आहे.
या ट्रॅव्हल्स मध्ये एकूण 22 प्रवासी प्रवास करत होते, यातील सहा प्रवासी जखमी झाले आहे.
परिसरातील तरुणांनी जखमींना तात्काळ बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले आहे
सर्व प्रवाशांना या ट्रॅव्हल्स मधून सुखरूप बाहेर काढण्यात आले असून सुदैवाने जीवित हानी टळली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.