खेळता खेळता ३०० फूट खोल बोरवेलमध्ये पडला ४ वर्षाचा चिमुकला अन्... क्षणाक्षणाला धडकी भरवणारे ७ तासांचे थरारक रेस्क्यू ऑपरेशन

Bihar Accident News : बोअरवेलसाठी खणलेल्या ३०० फूट खोल खड्ड्यात चार वर्षांचा मुलगा पडला. NDRF टीमच्या सलग ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले.
 खेळता खेळता ३०० फूट खोल बोरवेलमध्ये पडला ४ वर्षाचा चिमुकला अन्... क्षणाक्षणाला धडकी भरवणारे ७ तासांचे थरारक रेस्क्यू ऑपरेशन
खेळता खेळता ३०० फूट खोल बोरवेलमध्ये पडला ४ वर्षाचा चिमुकला अन्... क्षणाक्षणाला धडकी भरवणारे ७ तासांचे थरारक रेस्क्यू ऑपरेशनsaam tv
Published On

गावातील घराजवळच शेत होतं. त्या शेतात लहान मुलं खेळत होती. ४ वर्षांचा पियुषही त्यांच्यासोबत खेळत होता. बराच वेळ ते खेळत होते. संध्याकाळची वेळ होती. पुढच्या काही क्षणांत आपल्यासोबत काहीतरी भयंकर घडणार आहे किंवा घडू शकतं, या पुसटशा कल्पनेने या निरागस मुलांच्या मनालाही स्पर्श केला नसेल. पण जे घडलं ते भयंकरच. गावातल्या प्रत्येक ग्रामस्थाची आणि स्थानिक प्रशासनाची झोप उडवणारी घटना घडली. ४ वर्षांचा पियुष शेतात बोरवेलसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडला. तो खड्डा जवळपास ३०० फूट खोल होता. पियुषला काय झालं असेल, तो बरा असेल ना...सुखरूप असेल ना.. अशा एक ना अनेक प्रश्नांचं काहूर प्रत्येक गावकऱ्याच्या मनात माजलं असेल. तर पियुष सुरक्षित, सहीसलामत बाहेर यावा यासाठी प्रत्येक जण देवाकडे प्रार्थना करत होता. अखेर त्यांच्या प्रार्थनेला यश आलं आहे. ४ वर्षांचा पियुष सुखरूप आहे.

७ तासांचे रेस्क्यू ऑपरेशन

बिहारच्या गया जीमधील फतेहपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रघू नगर गावात ४ वर्षांचा मुलगा ३०० फूट खड्ड्यात पडला आणि सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. ही घटना गुरुवारी घडली. त्याला बाहेर काढण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागली. तब्बल ७ तासांच्या थरारक रेस्क्यू ऑपरेशननंतर पियुष कुमारला सुखरूप बाहेर काढण्यात आले. शेतात आई काम करत असताना पियुष मित्रांसोबत खेळत होता. खेळता खेळता अचानक तोल गेल्याने तो थेट ३०० फूट खड्ड्यात पडला होता.

 खेळता खेळता ३०० फूट खोल बोरवेलमध्ये पडला ४ वर्षाचा चिमुकला अन्... क्षणाक्षणाला धडकी भरवणारे ७ तासांचे थरारक रेस्क्यू ऑपरेशन
Accident News : भयंकर अपघात! रेल्वेची स्कूल व्हॅनला धडक, ३ विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू

आईनं आरडाओरडा केला अन्...

पियुषची आई सायंकाळी घराजवळच्या शेतात काम करत होती. पियुष आपल्या मित्रांसोबत बाजूलाच खेळत होता. जवळच बोरवेलसाठी ३०० फूट खोल आणि १२ फूट रुंद खड्डा खोदलेला होता. खेळता खेळता अचानक पाय घसरल्याने पियुष ३०० फूट खोल खड्ड्यात पडला. आईच्या लक्षात आलं. ती जोरात किंचाळली. आरडाओरडा केला. ते ऐकून गावातील लोक तात्काळ तिथे जमा झाले. पोलिसांना आणि NDRF पथकाला बोलावण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच फतेहपूरचे विभागीय अधिकारी अमिता आणि ब्लॉक अधिकारी शशी भूषण साहू देखील घटनास्थळी पोहोचले.

 खेळता खेळता ३०० फूट खोल बोरवेलमध्ये पडला ४ वर्षाचा चिमुकला अन्... क्षणाक्षणाला धडकी भरवणारे ७ तासांचे थरारक रेस्क्यू ऑपरेशन
Accident News : जळगावात भीषण अपघात, अनियंत्रित कार घाटात उलटली, ३ जणांचा जागीच मृत्यू

त्यांनी सर्व माहिती घेतली. क्षणाचाही विलंब न करता यंत्रणेच्या मदतीने तात्काळ बचावकार्य सुरू केले. घटनास्थळी खड्डा खोदण्याचे यंत्र मागवत लगेच मुख्य खड्ड्याच्या शेजारी दुसरा मोठा खड्डा खोदण्यात आला. जवळपास ७ तास रेस्क्यू ऑपरेशन राबवले गेले. NDRF पथकाच्या अथक प्रयत्नाने पहाटे ३ वाजता पियुषला सुखरूप बाहेर काढण्यात आले. NDRF पथकाच्या ७ तासांच्या यशस्वी प्रयत्नांनमुळेच ४ वर्षाच्या चिमुरड्याला सुखरूप बाहेर काढणे शक्य झाले, असे फतेहपूरच्या विभागीय अधिकारी अमिता सिन्हा म्हणाल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, पियुषला बाहेर काढल्यानंतर सर्वप्रथम ऑक्सिजनचा पुरवठा करत तात्काळ फतेहपूर आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. पियुषला कुठेही दुखापत झाली नाही. त्याची प्रकृती उत्तम असून लवकरच घरी सोडण्यात येणार आहे.

 खेळता खेळता ३०० फूट खोल बोरवेलमध्ये पडला ४ वर्षाचा चिमुकला अन्... क्षणाक्षणाला धडकी भरवणारे ७ तासांचे थरारक रेस्क्यू ऑपरेशन
Jagannath Rath Yatra : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरी, ३ भाविकांचा मृत्यू, २०० गंभीर जखमी

बोरवेलसाठी खोदलेल्या खड्ड्याभोवती कोणतीही सुरक्षा उपाययोजना का केली नव्हती, असा सवाल आता उपस्थित होत आहे. या प्रकरणी चौकशी करण्यात येत आहे. बोरवेलसाठी खोदलेल्या खड्ड्याभोवती सुरक्षेसाठी उपाययोजना न करणाऱ्या आणि निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

 खेळता खेळता ३०० फूट खोल बोरवेलमध्ये पडला ४ वर्षाचा चिमुकला अन्... क्षणाक्षणाला धडकी भरवणारे ७ तासांचे थरारक रेस्क्यू ऑपरेशन
Accident News : भीषण अपघात! भरधाव ट्रकची जोरदार धडक, कारचा चेंदामेंदा; एकाच कुटुबांतील ३ जणांचा मृत्यू , २ जखमी
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com