Accident News : भीषण अपघात! भरधाव ट्रकची जोरदार धडक, कारचा चेंदामेंदा; एकाच कुटुबांतील ३ जणांचा मृत्यू , २ जखमी

Uttar Pradesh Bareli Car Accident News : उत्तर प्रदेशातील बरेली जिल्हा इनायतपूर गावाजवळ भरधाव ट्रकने स्कर्पिओला जोरदार धडक दिली. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला असून, फरार ट्रकचालकाचा पोलिस तपास करत आहेत.
 Accident News : भीषण अपघात! भरधाव ट्रकची जोरदार धडक, कारचा चेंदामेंदा; एकाच कुटुबांतील ३ जणांचा मृत्यू , २ जखमी
Accident News : भीषण अपघात! भरधाव ट्रकची जोरदार धडक, कारचा चेंदामेंदा; एकाच कुटुबांतील ३ जणांचा मृत्यू , २ जखमीmeta ai
Published On

उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातून रस्ते अपघाताची एक भयंकर घटना समोर आली आहे. नवाजगंज पोलिस ठाण्याचा हद्दीत इनायतपूर गावाजवळ हा अपघात झाला आहे. मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने स्कॉर्पिओला जोरदार धडक दिली. या धडकेत गाडीच्या पुढील भागाचा पार चेंदामेंदा झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील तीन लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि दोन लोक गंभीर जखमी झाले आहेत. सूचना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून घटनेची कसून चौकशी केली जात आहे.

इनायतपुर गावाजवळ गुरूवारी सकाळी ही घटना घडली. अपघातग्रस्त कुटुंब लखमीपूर जिल्ह्यातील असून स्कॉर्पिओमधून संपूर्ण कुटुंब पंजाबला जात होते. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार ट्रक इतक्या वेगात होता की स्कॉर्पिओचा पार चक्काचूर झाला. कुटुंबातील तीन लोकांचा जागीच मृत्यू झाला असून स्थानिकांच्या आणि पोलिसांच्या मदतीने जखमींना रूग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान ट्रकचालकाने अपघात होताच घटनास्थळावरून फरार झाला आहे.

 Accident News : भीषण अपघात! भरधाव ट्रकची जोरदार धडक, कारचा चेंदामेंदा; एकाच कुटुबांतील ३ जणांचा मृत्यू , २ जखमी
Himachal Pradesh bus accident : खासगी बस दरीत कोसळली, ८ जणांचा मृत्यू; अनेक प्रवासी जखमी

अपघाताची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघातादरम्यान काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी वाहने पर्यायी मार्गाने वाहने वळवत वाहतूक सुरळित केली.

अपघाताची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघातादरम्यान काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी वाहने पर्यायी मार्गाने वाहने वळवत वाहतूक सुरळित केली.

 Accident News : भीषण अपघात! भरधाव ट्रकची जोरदार धडक, कारचा चेंदामेंदा; एकाच कुटुबांतील ३ जणांचा मृत्यू , २ जखमी
UP Politics: मंत्रिमंडळ विस्तारावरून भाजपमध्ये नाराजी उफाळली? माजी खासदाराच्या विधानाने खळबळ

पोलिस या अपघाताचा तपास करत असून अपघाताचे नेमके कारण लवकरच समोर येणार आहे. प्राथमिक तपासात ट्रकचा वेग हे अपघाताचे कारण असले तरीही, सीसीटिव्ही फुटेज तसेच प्रत्यक्षदर्शींचे जबाबानुसार पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. महामार्गावर वेगाचे नियम न पाळणाऱ्या वाहनांवर कडक कारवाईची मागणी स्थानिकांनी केली आहे.

 Accident News : भीषण अपघात! भरधाव ट्रकची जोरदार धडक, कारचा चेंदामेंदा; एकाच कुटुबांतील ३ जणांचा मृत्यू , २ जखमी
Pune Accident : वारीत पुन्हा भयंकर अपघात, भरधाव कारने वारकऱ्याला चिरडले, जागेवरच मृत्यू
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com